आपल्यापैकी अनेकजण ट्रेनने प्रवास करतात. ट्रेनचा प्रवास हा सोपा आणि स्वस्त मानला जातो. दररोज कामानिमित्त प्रवास करणारे अनेकजण असतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कधी कधी ट्रेनला स्टेशन येण्यापूर्वी काही अंतरावर थांबवलं जात. असं नेमकं का घडतं हे तुम्हाला माहीत आहे का? यामागे देखील एक कारण आहे जे जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल..
भारतीय रेल्वे नेटवर्कची व्याप्ती खूप मोठी आहे. भारतीय रेल्वे ६८,१०३ किमी लांबीसह जगातील चौथ्या नंबरचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. याठिकाणी दररोज हजारो ट्रेन धावतात. यापैकी काही गाड्या लोकल आहेत तर काही लांब पल्ल्याच्या आहेत.
या गाड्या स्टेशनवर येण्यापूर्वी एक ठराविक वेळ निश्चित केली जाते. ज्यांच्यानुसार घोषणाही केली जाते. यासोबत प्रत्येक ट्रेनसाठी एक प्लॅटफॉर्मही निश्चित करण्यात आला आहे. मात्र काही कारणांमुळे गाड्या उशिरा येतात. अशावेळी दुसरी ट्रेन येण्याची वेळ येते.
(हे ही वाचा: ५ रुपयांचे जुने नाणे का बंद करण्यात आले? यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)
अशावेळी स्टेशन मॅनेजर ट्रेननुसार कोणती ट्रेन आधी स्टेशनवर आणायची ते ठरवतात. जर सुपरफास्ट ट्रेन आली आणि पॅसेंजर ट्रेन येत असेल तर तिला बाहेरच्या बाजूने थांबण्याची सूचना दिली जाते. त्यामुळे ती ट्रेन बाहेरच्या बाजूने थांबवली जाते. त्यामुळे कधीकधी ट्रेन स्टेशनला येण्याआधीच थांबतात.