आजच्या घडीला प्रत्येकाच्या आयुष्यात गुगल हे ज्ञान मिळवण्याचं सर्वात मोठं माध्यम बनलं आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा शोध घ्यायचा असेल, तेव्हा तुम्ही गूगलवर क्लिक करता. दिवसेंदिवस मोबाईल फोनचा वापर वाढत असल्याने गुगलचं महत्व अधिक वाढलं आहे. अनेक वेबसाईट्स साइन इन करण्यासाठी वेरिफिकेशनपासून ते वेगवेगळ्या उद्देशांसाठी तंत्रज्ञानातील दिग्गजांवर विश्वास ठेवतात. जेव्हा तुम्ही यापैकी कोणत्याही वेबसाईटवर पोहोचण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही माणूस आहात का, याचा दाखला या वेबसाईट घेत असतात. स्क्रीनवर तुम्हाला एक बॉक्स दिसतो, ज्यामध्ये तुम्ही रोबोट नसल्याचं सिद्ध करावं लागतं. याची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला साईडला दिलेल्या बॉक्सवर क्लिक करावी लागते. त्यानंतरच तुम्ही त्या वेबसाईटवरील कंटेट पाहू शकता.

गूगल I AM NOT ROBOT वर क्लिक करायला का सांगतं?

सामान्यत: प्रत्येक व्यक्ती कोणताही विचार न करता या बॉक्सवर क्लिक करतो. अनेक लोक सांगतात की, गुगलला माऊसच्या हालचालींवरून माणूस आणि रोबोट यामधील फरक समजतो. पण सत्य आणखी वेगळं आहे. जेव्हा तुम्ही बॉक्सवर क्लिक करता, वेबसाईट लगेच तुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर जाते. याप्रकारे तुमच्या सर्व सर्चिंगबाबत माहिती मिळवली जाते. सायबर सिक्योरिटी फर्मनुसार, कॅप्चा (कंप्यूटर आणि माणसांमधील फरक सांगणारा ऑटोमॅटिक पब्लिक ट्यूरिंग टेस्ट) तुमच्या कर्सरच्या वेगाला ट्रॅक करतं.

monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
Viral Video Shows Pet Dog Wants To Ride
‘मम्मी प्लिज मला चढू दे…’ जत्रेत राईडमध्ये बसण्यासाठी श्वानाचा हट्ट, मालकिणीने केला ‘असा’ पूर्ण; पाहा Viral Video
do you ever see a monkey flying a kite
Video : माकडाला कधी पतंग उडवताना पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच
mind reading machine china
मनकवडं मशीन अवतरलं, फायदा होणार की गडबड?
manoj jarange patil and devendra fadnavis
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा, अन्यथा…
google willow chip
अब्जावधी वर्षांचं काम मिनिटांत होणार? ‘Google Willow’ चिप काय आहे?

नक्की वाचा – सावधान! समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाताय? मग ‘हा’ धक्कादायक Video एकदा पाहाच

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, माणासांकडून करण्यात येणाऱ्या मोस्ट डायरेक्ट मोशनमध्येही मायक्रोस्कोपिक लेव्हलपर्यंत काही प्रमाणात विविधता आढळते. धोट्या छोट्या मूव्हमेंट ज्यांना तुम्ही सहज कॉपी करू शकत नाही. जर कर्सरच्या वेगात कोणत्याही प्रकारची साम्यता नसल्यास यूजर वैध नसल्याचं टेस्टद्वारे निर्णय दिला जातो. बीबीसी क्विज शोचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, तु्म्ही या बॉक्सवर क्लिक केल्यावर गुगल तुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीपर्यंत पोहोचतं. त्यानंतर कंप्यूटरद्वारे तुम्ही रोबोट आहात की मानव, याबाबत माहिती देतो.

Story img Loader