Why Dogs Cry at Night : अनेकदा पाळीव किंवा भटकी कुत्री रात्री रडताना दिसतात. कुत्री रडू लागली की लोकांच्या मनात धडकी भरते. कारण यामागे असंख्य धार्मिक कारणे सांगितली जातात. परंतु, कुत्री रडण्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. मानवाला ज्याप्रमाणे भाव-भावना, संवदेना असतात त्याचप्रमाणे कुत्र्यालाही असतात. त्यामुळे विविध भौतिक कारणांमुळे माणूस ज्याप्रमाणे रडू लागतो, त्याचप्रमाणे कुत्राही रडू लागतो. कुत्रे रडण्यामागीची नेमकी वैज्ञानिक कारणे आज जाणून घेऊयात. Dogseechew या संकेतस्थळाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
भूक लागणे
भूक लागल्यावर माणूस ज्याप्रमाणे अस्वस्थ होतो, चलबिचल होतो त्याचप्रमाणे कुत्र्यांचीही तीच अवस्था होते. माणूस निदान स्वतःच्या हाताने काहीही खायला घेऊ शकतो. मात्र प्राण्यांच्या बाबतीत ते होत नाही. ते हतबल असतात. त्यामुळे भुकेमुळे कुत्रे रडू लागतात. पाळीव प्राण्यांच्या ठरलेल्या वेळा असतात, त्याच वेळेत त्यांचे मालक त्यांना जेऊ घालतात. परंतु, भटक्या कुत्र्यांना नियमित अन्न मिळेलच याची शाश्वती नसते. परिणामी भुकेमुळे कुत्रे रडू लागतात.
हेही वाचा >> भटके कुत्रे माणसांवर हल्ले का चढवतात? चावा घेतल्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा यावर काय सांगतो…
दात येण्याची कारणे
मुलाची साधारण वाढ झाली की त्याला दात येऊ लगात. मुलांना दात येताना प्रचंड त्रास होतो. त्याचप्रमाणे कुत्र्यांनाही दात येताना प्रचंड त्रास होत असते. म्हणूनही कुत्रे रडू शकतात. त्यामुळे कुत्र्यांना वेळीच उपचार केल्यास त्यांच्या वेदना कमी होऊ शकतात.
वाईट व्यक्तींची चाहूल लागल्यास
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पाळीव कुत्र्यांना व्यवस्थित अन्न दिल्यानंतर आणि त्यांची योग्य ती वैद्यकीय काळजी घेतल्यानंतरही ती का रडतात? तर त्यामागचं कारण असतं संकटाची चाहूल. एखादा व्यक्ती तुमच्या घरात अवैधपणे शिरत असेल, तुमच्या घरात चोरवाटेने शिरण्याचा प्रयत्न करत असेल तर ही कुत्रे चेतावणी म्हणून जोरजोरात ओरडतात किंवा रडू लागतात. भटक्या कुत्र्यांचंही तेच असतं. कधीकधी आपला ठावठिकाणा आपल्या साथीदारांना कळावा याकरताही भटकी कुत्रे रात्रीची ओरडतात किंवा रडतात.
हेही वाचा >> यूट्युबवर पहिला Video कोणी पोस्ट केला? जाणून घ्या आज किती आहेत सबस्क्रायबर्स
नैसर्गिक विधी
पाळीव कुत्रे नैसर्गिक विधीसाठी रडू शकतात. झोपेत असताना त्यांना शौचास झाल्यास ते रडतात. त्यामुळे झोपण्याआधी कुत्र्यांना बाहेर फिरायला घेऊन जा. खाललेलं अन्न जिरलं की त्यांना शौसाच होते. मग, नैसर्गिक विधी ओटापून कुत्रे एकदा झोपले की शांत राहतील.
माणसांच्या आठवणीत
पाळीव प्राणी आणि कधीकधी भटके कुत्रेसुद्धा माणसाळलेले असतात. आपल्या माणसांमध्ये राहण्याची त्यांना सवय होते. ही माणसं सोडून गेली, लांब गेली किंवा दिसेनाशी झाली की त्यांच्या आठवणीत कुत्रे रडतात. अशावेळी कुत्र्यांना खेळणी किंवा इतर प्रकारात गुंतवणूक ठेवणे गरजेचे आहे. यातही प्राणी गुंतून न राहता आठवणीत रडत असतील तर पशुवैद्यकांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
वेदना असह्य होत असल्याने
प्राणी इतरत्र फिरत असतात, त्यामुळे त्यांनाही इजा होण्याची शक्यता असते. किंवा काहीतरी खाल्ल्याने त्यांना पोटाचे विकार झालेले असू शकतात. त्यांच्या वेदना ते तोंडाने सांगू शकत नसल्याने ते अनेकदा ओरडून किंवा रडून सांगतात. अशावेळी त्यांची वैद्यकीय चाचणी करणे गरजेचं आहे.
हेही वाचा >> चार आण्याची कोंबडी अन्…, १ रुपयाचं नाणं बनवायला किती खर्च येतो माहितेय का? तुम्हीही डोक्यावर हात माराल!
कुत्र्यांनाही येतं नैराश्य
माणसांना ज्याप्रमाणे नैराश्य येतं, त्याप्रमाणे कुत्र्यांनाही नैराश्य येऊ शकतं. सतत एकटं राहणं, एका जागी बसून राहणं यामुळे कुत्री कंटाळतात. परिणामी ते ओरडू किंवा रडू लागतात. त्यामुळे त्यांना अॅक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. विविध कामांत त्यांना गुतंवून ठेवल्यास त्यांचं नैराश्य दूर होऊ शकतं.