Interesting Fact About Birds: मुंबईसारख्या महानगरामध्ये दररोज हजारो लोक कामानिमित्त प्रवास करत असतात. बहुतांश लोक ऑफिसला जाण्यासाठी ट्रेन, बस अशा सार्वजनिक वाहनांचा वापर करत असतात. कामावरुन घरी येत असताना बऱ्याचजणांना तंद्री लागते. काहीजण प्रवासादरम्यान उभे असतानाच झोप घेतात. उभ्या-उभ्या पेंग आल्यावर तोल गेल्याने अडखळून पडण्याची शक्यता असते. आपण उभे राहून झोपू शकत नाही. जर तसा प्रयत्न केला, तर आपण धडपडून पडू. पण झाडांच्या लहान फांद्यांवर झोपताना पक्षी तोल जाऊन खाली का पडत नाही असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झोपेत असतानाही पक्ष्यांच्या शरीराचा तोल कसा टिकून राहतो?

पक्षी हे झाडावर घरटी करुन राहतात हे सर्वांना ठाऊक आहे. पण बरेचसे पक्षी जेव्हा एकटे राहत असतात, तेव्हा घरटं न बांधता झाडांवर वास्तव करत असतात. अशा वेळी ते झाडांच्या फांद्यावर झोपी जातात. झोपेत असतानाही त्यांचा तोल जात नाही. ते लहान फांदीवरही शरीराचा समतोल राखत शांतपणे झोप घेतात. झोपेत असताना हल्ला होऊ नये म्हणून बहुतांश पक्षी या सेफ मोडमध्ये असतात. पण पक्षी असं कसं करु शकतात? पक्ष्यांच्या पंजांची विशिष्ट पद्धतीने रचना केलेली असते. झोप घेताना त्यांचे पंजे झाडांच्या खांदीला पकडून ठेवतात. ही पकड खूप घट्ट असल्याने त्यांचे शरीर समतोल स्थितीमध्ये राहते.

आणखी वाचा – सुंदर दिसणाऱ्या ‘या’ पक्ष्यांचा पंखात असते घातक विष; ३० सेकंदात होऊ शकतो मृत्यू

झोप घेताना पक्ष्यांच्या मेंदूमधील एक भाग नेहमी सक्रीय असते. या भागाच्या माध्यमातून ते नेहमी अलर्ट असतात. त्यांच्या झोपण्याच्या सवयीबाबत आणखी एक खासियत आहे. जंगलामध्ये कोणत्याही बाजूने शत्रूच्या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काही पक्षी डोळे उघडे ठेवून झोप घेऊ शकतात. यामध्ये पोपट, घुबड अशा पक्षांचा समावेश होतो. तर काही पक्षांच्या डोळ्यांवर तीन-तीन पापण्या असतात. पहिल्या पापण्या उघड-झाप करण्यासाठी, दुसऱ्या स्तरावरील पापण्या डोळे स्वच्छ करण्यासाठी तर तिसऱ्या स्तरातील पापण्यांचा उपयोग झोपताना सावध राहण्यासाठी होत असतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why dont birds fall down while sleeping on trees know reason yps