भारतीय रेल्वेचे जाळे खूप मोठे आहे. देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या धावतात. काही गाड्यांचा प्रवासही खूप लांब पल्ल्याचा असतो. ११५,००० किलोमीटरवर पसरलेल्या विशाल नेटवर्कसह, भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थितीत रेल्वेमध्ये चोरीच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. प्रवाशांच्या सामानासोबतच रेल्वेमधील पंखे आणि बल्ब चोरीला जाण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रेल्वेने या चोरीला आळा घातला आहे.

रेल्वेने केला नव्या तंत्रज्ञानाचा वापर

स्विच, बल्बबरोबरच रेल्वेतील पंख्यांची चोरी झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे इंजिनिअर्स पंख्यांचे अशा प्रकारे डिझाईन केले आहे की ते घरात किंवा दुकानात वापरता येणार नाहीत. केवळ ट्रेनमध्येच हे पंखे वापरता येऊ शकतात. आता घरात हे पंखे का लागू शकत नाहीत, जाणून घेऊया हे पंखे किंवा दुकानात का वापरता येणार नाही.

Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Vande Bharat pune, special train pune, pune train,
पुण्यासाठी ‘वंदे भारत’ नाही, पण ही विशेष गाडी धावणार
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Margaon to Panvel special trains for return journey to Konkankars Mumbai news
मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाड्या, परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांना दिलासा
Central Railway decision to revise the charges of coolies Mumbai
मुंबई: हमालांच्या शुल्कात १० रुपयांनी वाढ
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 

आणखी वाचा : अरे वा! आता व्हॉट्सअ‍ॅपवर घरबसल्या चेक करा ट्रेनचे लोकेशन; जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत…

फक्त ट्रेनमध्येच लागू शकतात हे पंखे

आपल्या घरात दोन प्रकारची वीज वापरली जाते. पहिला AC म्हणजे Alternate Current आणि दुसरा DC म्हणजे Direct Current. आपल्या घरांमध्ये वापरल्या जाणा-या अल्टरनेट करंटची कमाल शक्ती २२० व्होल्ट आहे आणि डायरेक्ट करंटचा घरात वापर केला जातो तेव्हा तो फक्त ५, १२ किंवा जास्तीत जास्त २४ व्होल्ट इतका असतो. याच गोष्टींचा विचार करुन इंजिनिअर्सने ट्रेनमध्ये लागणारे पंखे ११० व्होल्टचे बनवले आहेत आणि जे फक्त DC वर चालू शकतात. त्यामुळे विचार केला तरी हे पंखे घरात वापरता येऊ शकत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे ट्रेनमधून पंखा चोरलाच तर त्या व्यक्तीला सात वर्षांची जेल आणि आर्थिक दंड लागू शकतो.