Hindu Rituals : प्रत्येक धर्मात लग्नाच्या वेळी वेगवेगळ्या रूढी-परंपरा असतात. या रूढी-परंपरांचे विशेष महत्त्व असते. हिंदू धर्मात अशीच एक परंपरा आहे. या परंपरेनुसार हिंदू धर्माच्या लग्नात नवरदेव घोडीवर बसतो. पण, तुम्हाला माहीत आहे का नवरदेव घोडीवरच का बसतो; घोड्यावर का नाही? आणि तेही पांढऱ्याच घोडीवर का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

लग्नात नवरदेवाने घोडीवर बसणे ही परंपरा खूप जुनी आहे. असं म्हणतात की, रामायण-महाभारतापासून ही परंपरा पाळली जाते. अनेक जण लग्नात घोडीवर बसले असतील किंवा काही लोक भविष्यात बसणार असतील. मग तुम्हाला या परंपरेमागील कारण माहीत असायला हवे.

Olya Narlacha Paratha Recipe in marathi
रविवारी स्पेशल नाश्त्यासाठी झटपट बनवा चवदार ओल्या नारळाचे पराठे; वाचा सोपी रेसिपी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
vehicle also emit white smoke constantly
तुमच्याही वाहनातून सतत पांढरा धूर निघतो? ही समस्या का उद्भवते याची कारणे जाणून घ्या आणि वेळीच सावध व्हा
after controvrcial remark on rahul gandhi bonde said in sense my statement makes mother angry with child
नागपूर : राहुल गांधींवर टीका करणारे भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले ” माझे वक्तव्य आई मुलाला रागावते त्या अर्थाने “
Loksatta lokrang article about Painting Ganpati 2024
चित्रास कारण की…: गोलम् स्थूलम् सुंदरम्
Anushka Sharma shares how her family adopted an early sleep routine; neurologist explains its importance for couples with kids
अनुष्का-विराट लवकर जेवण करतात अन् लवकर झोपतात; जाणून घ्या त्यांचं स्लीप रुटीन अन् त्याचे फायदे
after facing lots of difficulties two come together and become one forever
वर्धा : तो अनाथ, ती दिव्यांग ! प्रेमाच्या आणाभाका आणि कुटुंबाचा विरोध झुगारून शुभमंगल.
Ukdiche Modak Recipe
Ukdiche Modak : उकडीचे मोदक फुटतात? टेन्शन घेऊ नका, या टिप्स जाणून घ्या अन् बनवा स्वादिष्ट मोदक

नवरदेव घोडीवरच का बसतो; घोड्यावर का नाही?

असं म्हणतात की, घोडा हा रागीट स्वभावाचा असतो. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय घोड्यावर सैर करणे खूप कठीण आहे. घोड्याच्या या चपळ स्वभावामुळेच घोड्याला पूर्वी युद्धभूमीवर वापरले जायचे; पण लग्नात घोड्याच्या रागीट, चपळ व शक्तिवान या गुणांचा काहीही फायदा होत नसतो. उलट लग्नात त्यागाला अधिक महत्त्व दिले जाते. घोड्याच्या तुलनेत घोडी अधिक शांतताप्रिय असते. त्यामुळे नवरदेव लग्नात घोड्यावर नाही, तर घोडीवर बसतो.

घोडीवर बसण्यामागे काय आहे कारण?

लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि त्याचा अर्थ मुलगा नव्या आयुष्याची सुरुवात करीत आहे. अशात तो वैवाहिक आयुष्याची जबाबदारी उचलण्यास सक्षम आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी नवरदेवाला घोडीवर बसवण्याची प्रथा आहे.

नवरदेव पांढऱ्या घोडीवर का बसतो?

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, नवरदेव पांढऱ्या घोडीवर बसतो; पण पांढरीच घोडी का? पांढरी घोडी ही शुद्धता, प्रेम, उदारता, शांतता, सौभाग्य व समृद्धीचं प्रतीक असते. या गुणांमुळे वैवाहिक आयुष्य आणखी समृद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे लग्नात नव्या आयुष्याची सुरुवात करताना नवरदेव पांढऱ्या घोडीवर बसतो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)