Why is AC installed in the ATM?: आपल्याला बँकिंग सेवा अधिकाधिक सुरळीत होण्यासाठी सुरू झालेली ही सेवा जणू वरदानच आहे. पैसे काढण्यासाठी आपल्याला आधी बँकेत जावे लागत असे मात्र, आता हे एटीएम कार्ड आणि एटीएम मशीन आपले काम सोपे करत आहे. आता उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणे स्वाभाविक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात एटीएममध्ये एसीची हवा खाताना अनेकजण तुम्हाला अनेकजण दिसले असतील. किंवा तुम्हीही एटीएममध्ये एसीची हवा घेत असणार. वास्तविक, तुमचे शहर कितीही लहान किंवा मागासलेले असले, तरी तेथे एटीएम मशीन लावले असेल, तर त्या एटीएममध्ये एसीही बसवला पाहिजे. हा एसी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी बसवला आहे असे बहुतेकांना वाटते. पण तसं अजिबात नाही, एटीएममध्ये एसी बसवण्यामागचं कारण काहीतरी वेगळंच आहे. या मागचे खरे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ATM मध्ये का लावलेले असतात AC?

भारतातील बहुतेक ATM सेंटरमध्ये दोन एअर कंडिशनर आहेत. एक स्टँडबाय म्हणून ठेवले आहे आणि दोन्ही अल्टरनेट वापरले जातात. परंतु बँक तुम्हाला गर्मीपासून सुटका मिळावी, या हेतूने अजिबातच ATM मध्ये एसी लावलं नाहीये, तुम्हाला ते हवा देण्यासाठी लावलेले नसून त्याचं कारण दुसरचं आहे.

एटीएम मशीन थंड राहण्यासाठी ते बसवले आहे. वास्तविक, एटीएम मशीन सतत चालू राहते, त्यामुळे ते खूप गरम होते. एटीएममध्ये एसी लावला नाही तर येत्या काही दिवसांत तो खराब होईल. म्हणूनच तुमच्या लक्षात आले असेल की ज्या एटीएममध्ये एसी खराब आहे, ते एटीएम अनेकदा बंद असतात, म्हणजेच त्यातून पैसे निघत नाहीत. त्यामुळे एटीएम मशीन थंड ठेवण्यासाठी आणि सतत सर्व्हिस देण्यासाठी त्या केबिनमध्ये एसी बसवण्यात येतो.

(हे ही वाचा : Smartphone Camera: स्मार्टफोनचा कॅमेरा डाव्या बाजूलाच का असतो? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण )

आणखी एक फायदा

तुमचे खाते कोणत्याही बँकेत असो, तुम्ही कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकता, परंतु एका ठराविक मर्यादेनंतर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले, तर ती बँक स्वतःहून काही शुल्क आकारते. अशा परिस्थितीत, अनेक बँका त्यांच्या एटीएममधील एसी स्वच्छ ठेवतात जेणेकरून लोक उन्हाळ्यात त्यांच्या बँकेच्या एटीएममध्ये येऊन पैसे काढू शकतील. याशिवाय एटीएममध्ये एसी सुरू असताना लोक सहज पैसे काढतात.

तथापि, UPI पेमेंट सुरू झाल्यापासून, लोकांनी त्यांचे रोख पैसे काढण्याचे प्रमाण खूप कमी केले आहे. त्यामुळेच आता शहरांबरोबरच खेड्यापाड्यातील एटीएममध्येही गर्दी दिसत नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is ac installed in the atm machine room you also know by clicking pdb