Why is Afghanistan Playing Home Matches In India: येत्या ९ सप्टेंबरपासून भारतात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. न्यूझीलंडचा क्रिकेट संघ प्रदीर्घ कालावधीनंतर भारतात आला आहे. आज सकाळीच संघ भारतात दाखल झाला. न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ आधीच भारतात आला असून आता न्यूझीलंडच्या आगमनाने सामन्याच्या तयारीला आणखी वेग येणार आहे. नोएडा येथे ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत एकच कसोटी खेळली जाणार आहे. नोएडा हे अफगाणिस्तान संघाचे होम ग्राउंड बनले आहे.

अफगाणिस्तानचा संघ भारतात खेळतो घरच्या मैदानावरील सामने

अफगाणिस्तानचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावरील सामने द्विपक्षीय मालिका या भारतात खेळतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अफगाणिस्तानला त्यांच्या घरच्या सामन्यांसाठी भारतीय स्टेडियम वापरण्यास मान्यता दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट असल्याने सततचा संघर्ष आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव अफगाणिस्तानचे त्यांच्या देशान न होता भारतात खेळवले जातात. अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीनंतर राजकीय बदल झाले असून अफगाणिस्तान संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कायम सुरू ठेवण्याचे ठरवल्यानंतर बीसीसीआयने अफगाणिस्तानला भारतात क्रिकेट खेळण्याची मान्यता दिली. अफगाणिस्तानच्या अनेक द्विपक्षीय मालिका भारतात होता.

Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

हेही वाचा – Ravindra Jadeja: रवींद्र जडेजाने राजकारणात ठेवले पाऊल, पत्नी रिवाबा जडेजाने फोटो शेअर करत दिली माहिती

सुरुवातीला अफगाणिस्तानने युएई तसंच श्रीलंकेतील दंबुला इथे सामने खेळले. त्यानंतर बीसीसीआयने त्यांना मदतीचा हात दिला. बीसीसीआयने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाबरोबर एमओयू केला. ग्रेटर नोएडातील ग्रेटर नोएडास्थित शहीद विजय सिंग पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अफगाणिस्तानला देण्यात आलं. २०१७ मध्ये अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका इथेच आयोजित केली. नामिबियाविरुद्धचे काही सराव सामनेही इथे खेळवण्यात आले. या मैदानावर एक अवैध लीग खेळवण्यात आल्याने बीसीसीआयने या मैदानाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं. त्यामुळे अफगाणिस्तानला होम ग्राऊंड बदलावं लागलं. ते डेहराडून इथे राजीव गांधी स्टेडियमवर खेळू लागले. त्यानंतर लखनौ इथे अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवरही त्यांनी सामने खेळले. यंदा पुन्हा एकदा अफगाणिस्तान संघ नोएडात खेळणार आहे.

हेही वाचा – गंभीर आजाराशी लढा देतोय ‘हा’ भारतीय वंशाचा क्रिकेटपटू, दिल्लीतील रूग्णालयात ICUमध्ये केलं दाखल

अफगाणिस्तान वि न्यूझीलंड कसोटी सामना

अफगाणिस्तानविरूद्ध या कसोटी सामन्यासाठी टीम साऊदी न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करत आहे. अशा अनेक खेळाडूंची संघात निवड झाली आहे, जे भारतात येऊन आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात. त्यात केन विल्यमसन, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र आणि मिशेल सँटनर यांच्या नावांचा समावेश आहे.

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना होणार असला तरी हा सामना ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणार नाही. त्यामुळे या सामन्यातील विजय किंवा पराभवाचा WTC गुणांच्या टेबलवर कोणताही परिणाम होणार नाही. आयसीसीच्या कसोटी गुणतालिकेतील टॉप ९ संघांमध्येच लढत होते. जे संघ टॉप-९ च्या बाहेर असतात त्यांच्यातील कसोटी सामन्यांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर परिणाम होत नाही. अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या देशांविरूद्धच्या कसोटी सामन्यांचा गुणतालिकेवर परिणाम होणार नाही.

हेही वाचा – ६६ कोटी! कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने २०२३-२४ साठी भरला सर्वाधिक कर?

अफगाणिस्तान क्रिकेट संघ

अफगाणिस्तानचा संघ यापूर्वीच भारतात आला आहे आणि संघाने नोएडामध्ये एक सामनाही खेळला होता, ज्यामध्ये संघाच्या खेळाडूंची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. संघाची कमान हशमतुल्ला शाहिदीच्या हाती आहे. मात्र संघाचा स्टार खेळाडू राशिद खान सामन्यातून बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला. त्याला दुखापत झाली असून तो आणखी काही काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या संघातही अनेक आयपीएल स्टार खेळाडू आहेत.

AFG vs NZ: कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ

अफगाणिस्तान संघ :

हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झाद्रान, रियाझ हसन, अब्दुल मलिक, रहमत शाह, बहीर शाह मेहबूब, इक्रम अलीखेल (यष्टीरक्षक), शाहीदुल्ला कमाल, गुलबदीन नायब, अफसर झझाई (यष्टीरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, झियाउर रहमान अकबर, शम्सुरहमान, कैस अहमद, झहीर खान, निजात मसूद, फरीद अहमद मलिक, नवीद झादरन, खलील अहमद आणि यामा अरब.

हेही वाचा – Duleep Trophy 2024: भारतात जन्म अन् इंग्लंडकडून खेळले आंतरराष्ट्रीय क्रिकेट, कोण आहेत दुलीप सिंह? ज्यांच्या नावे भारतात खेळवली जाते मोठी देशांतर्गत स्पर्धा

न्यूझीलंडचा कसोटी संघ:

टीम साऊदी (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, टॉम लॅथम (उपकर्णधार), डॅरिल मिशेल, विल ओ’रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र , मिचेल सँटनर, बेन सियर्स, केन विल्यमसन, विल यंग.