विहीर गोल का असते याकडे तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? ही त्रिकोण, चौरस किंवा षटकोनी आकाराची का नसते? खरं तर यामागे एक रंजक कारण आहे. जे जाणून तुम्हीही थक्क व्हाल. विहिरीच्या गोल आकाराचे कारण विज्ञान आहे. विहीर बराच काळ टिकली पाहिजे म्हणून ती गोल आकाराची बांधली जाते. विहीर आधीपासून बांधली जात असून, तेव्हापासून त्याची काळजी घेतली जात आहे. विहिरीचा गोलाकार आकार आणि ती बांधताना घ्यायची इतर खबरदारी जाणून घेऊया..
म्हणून सर्व विहिरी गोल असतात..
सर्वात आधी हे जाणून घ्या की जेव्हा जेव्हा एखादा द्रव पदार्थ साठवला जातो तेव्हा तो ज्या आकारात साठवला जातो तसाच आकार घेतो. जेव्हा एखादा द्रव पदार्थ भांड्यात ठेवला जातो तेव्हा तो त्याच्या भिंतींवर दबाव टाकतो. जर एखादी विहीर चौकोनी आकारात बांधली तर आतील पाणी विहिरीच्या भिंतीच्या कोपऱ्यांवर जास्त दाब टाकेल. असं घडल्याने विहिरीचे वय कमी होईल आणि त्यामुळे विहीर फुटण्याचा धोका निर्माण होतो. यामुळेच विहीर नेहमी गोल आकारात बनवली आहे. त्यामुळे विहिरीच्या भिंतीवर सर्व बाजूंनी पाण्याचा दाब समान असतो.
बहुतेक भांडीही गोल असतात..
आपल्या स्वयंपाकघरातील बहुतेक भांडी देखील गोल असतात. ग्लास, ताट, वाटी, बादली किंवा थाळी पाहिली तर ती सगळी गोल असतात. भांड्यावरील पृष्ठभागावरील दाबाचा नियम लक्षात घेऊन त्यांना गोलाकार बनवले जाते. गोल भांड्यांचे आयुष्य जास्त असते.
( हे ही वाचा: भारतातील ‘हे’ ३ रेल्वे मार्ग थेट परदेशात जातात; पहिल्या रेल्वेमार्गाचे नाव वाचून तुम्हीही थक्क व्हाल)
गोल विहिरीचे वैशिष्ट्य
तुम्ही चौकोनी आकाराच्या विहिरीही पाहिल्या असतील, पण त्या फारशा मजबूत नसतात. त्यांचे आयुष्य तुलनेने लहान आहे. गोल विहिरी जास्त काळ टिकतात. गोल विहिरीची माती जास्त खचत नाही. गोल विहिरीच्या आतील पृष्ठभागावरील दाब सर्व बाजूंनी सारखाच असतो.