आपल्याकडे फार पूर्वीपासून सोने आणि चांदी या धातूचा वापर केला जात आहे. या दोन्ही धातूंचे मूल्य अन्य धातूंपेक्षा अधिक असल्यामुळे यांचा वापर हा प्रामुख्याने नाणी तयार करण्यासाठी होत असे. नाण्यांसह दागिने बनवतानाही सोने-चांदी धातू वापरले जात असतं. आजही भारतामध्ये याच दोन प्रमुख धातूंचे दागिने तयार केले जाते. महिलांना सोन्याच्या दागिन्यांचे वेड असते असे म्हटले जाते. सणसमारंभामध्ये मिरवण्यासह एका प्रकारची इन्वेस्टमेंट म्हणूनही लोक सोन्यापासून दागिन्यांची निर्मिती केली जाते.
मंगळसूत्र, नेकलेस, अंगठी, बाजुबंद, लक्ष्मीहार, कानातले असे अनेक दागिन्यांचे प्रकार पाहायला मिळतात. असे असले तरी पैंजण हा दागिना प्रामुख्याने चांदीचाच असतो. सोन्याचे पैंजण हा प्रकार फार क्वचित पाहायला मिळतो. आपल्याकडे सोन्याचे पैंजण का घातले जात नाही असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज देणार आहोत.
पायात सोन्याचे पैंजण का घातले जात नाही?
सोन्याचे दागिने पायात घातल्याने लक्ष्मी देवतेचा अपमान होतो असे मानले जाते. कमरेच्या खाली पायांमध्ये सोन्यापासून तयार केलेले दागिने घातल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. सोने हे भाग्यलक्ष्मीचे स्वरुप आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. सोन्याचे दागिने शरीराच्या वरच्या भागांवर घालण्याचा सल्ला दिला जातो. चांदीमध्ये चंद्र देवतेचा वास असतो. चंद्राची शीतलता पायांद्वारे मेंदूपर्यंत पोहचण्यासाठी पायात चांदीपासून बनवलेले दागिने घातले जातात. पायाजवळ केतूचे स्थान असते. तो शांत राहावा यासाठी चांदीची मदत होते. हिंदू धर्मग्रंथानुसार, कमरेच्यावर सोन्याचे दागिने आणि कमरेच्या खाली चांदीचे दागिने घालणे योग्य मानले जाते.
आणखी वाचा – दागिन्यांमधील मेकिंग चार्जची नक्की काय आहे कहाणी? जाणून घ्या कशा पद्धतीनं केली जाते गणना
धार्मिक कारणांसह याला वैज्ञानिक बाजूदेखील आहे. सोन्यामध्ये उष्णता असते. तेव्हा असे दागिने घातल्याने पायांजवळ उष्णतेचे प्रमाण वाढू शकते. परिणाम शरीराचे तापमान वाढून विविध आजार होऊ शकतात. चांदीच्या दागिन्यांमुळे पायाजवळच्या भागात थंडावा असते. त्याशिवाय चांदीमुळे रक्तप्रवाह योग्य पद्धतीने सुरु राहायला मदत होते. तसेच हाडांना बळकटी देखील येते. महिलांनी पायात चांदीचे दागिने घातल्याने अनेक आजारांपासून त्यांचा बचाव होतो.