White Bedsheets In Hotel Rooms: उन्हाळा म्हटल्यावर काहीजणांच्या डोक्यात लगेच ‘उन्हाळ्याची सुट्टी’ हे शब्द येतात. सध्या उन्हाळा सुरु आहे. शाळा, कॉलेजच्या सुट्ट्या असल्यामुळे मुलं घरीच आहेत. अशा वेळी बऱ्याच घरांमध्ये फॅमिली पिकनिकचे प्लॅन्स सुरु होतात. काहीजण महाबळेश्वर, माथेरान अशा महाराष्ट्रातल्या थंड हवेच्या ठिकाणी जातात. तर काहीजण कुटुंबासह काश्मीर, शिमला असे फिरायचे प्लॅन्स बनवतात. सबळ आर्थिक स्थिती असलेले लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये परदेशवारी करुन येतात.
घराबाहेर असताना राहायची सोय म्हणून प्रत्येकजण हॉटेल्समध्ये राहत असतात. तुम्ही कोणत्याही हॉटेलमधील रुम बुक केली, तरी सगळीकडे एकाच रंगाच्या उश्या आणि चादरी पाहायला मिळतात. प्रवास करताना किंवा हॉटेल रुममध्ये राहताना बेडशीट या नेहमी पांढऱ्या रंगाच्याच का असतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.
पांढऱ्या बेडशीटमागील कारण
बेडशीट्स धुताना त्रास होऊ नये हे हॉटेल्समध्ये पांढऱ्या रंगाच्या बेडशीट्स वापरण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. प्रत्येक हॉटेलच्या रुममधील चादरी या एकसाथ ब्लीचचा वापर करुन धुतल्या जातात. पुढे या चादरी क्लोरीनमध्ये भिजवून साफ केल्या जातात. जर रंगीत बेडशीट्सचा वापर केला आणि त्या धुण्यासाठी ब्लीच, क्लोरीन वापरले, तर त्या बेडशीट्सचा रंग फिका पडण्याची शक्यता असते. पांढऱ्या रंगाची चादर असल्यास असे घडत नाही. शिवाय पांढऱ्या बेडशीट्सवर लागलेले डाग ब्लीचच्या मदतीने लगेच साफ होतात. काही वेळेस ओलसरपणामुळे बेडशीटला दुर्गंध येण्याची शक्यता असते. ब्लीचच्या वापरामुळे घाणेरडा वास नाहीसा होतो.
याव्यतिरिक्त पांढऱ्या रंगामुळे हॉटेल रुम्सना क्लासी लुक येतो. यामुळे लग्झरी लाइफस्टाइलची आवड असणाऱ्या लोकांना आकर्षित करता येते. तसेच पांढरा रंग हा मानसिक स्थैर राखण्यास मदत करतो. हा रंग सकारात्मकता आणि शांतीचे प्रतिक आहे. यामुळे रात्री बेडवर झोप घेऊन सकाळी उठल्यावर शांत आणि रिफ्रेश फील येतो. या कारणांमुळे बेडशीटसह उश्या व अन्य गोष्टीही पांढऱ्या रंगाच्या असतात असे म्हटले जाते.
आणखी वाचा – Delivery करण्यासाठी वापरले जाणारे बॉक्स हे नेहमी तपकिरी रंगाचे का असतात? जाणून घ्या..
पांढऱ्या रंगाची बेडशीट वापरण्याची सुरुवात नव्वदच्या दशकामध्ये झाली. त्याआधी लोक रंगीत बेडशीट्सचा उपयोग करत असत. १९९० नंतर पाश्चिमात्य हॉटेल डिझायनर्सनी हॉटेलमधील रुम्सना लग्झरी लूक यावा यासाठी पांढऱ्या बेडशीट्सचा वापर करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून आत्तापर्यंत ही गोष्ट जगभरात फॉलो केली जात आहे.