आजकाल ब्लूटूथ हे सर्व फोनमध्ये असते आणि बरेच जण रोज त्याचा वापर सुद्धा करतात. स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ हे ऑप्शन देण्यात आलं आहे. एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसमध्ये फाईल ट्रान्सफर करण्यासाठी, व्हिडीओ, गाणी ऐकण्यासाठी ब्लूटूथचा वापर होतो. म्हणून आता अनेकांकडे वायर्ड इअरफोन्सच्या जागी ब्लूटूथ पाहायला मिळतात. पण तुम्हालाही कधी असा प्रश्न पडला आहे का, ब्लूटूथ हे नाव कसं पडलं असेल? ‘ब्लूटूथ’चा आणि दातांचा काही संबंध आहे का? संबंध असेलच तर तो कसा आणि या नावामगची रंजक कथा काय? चला तर मग सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ…
मोबाईल, कॉम्प्युटरमधील ब्लूटूथ हे ऑप्शन ऑन करताच तुम्ही पाहिजे तो डेटा पाठवू शकता घेऊ शकता. त्यामुळे हे एक युझर फ्रेंडली ऑप्शन मानलं जाते. यावरून तुम्ही कोणत्याही अडचणींशिवाय गाणी ऐकण्यासह फोन उचलू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का, ब्लूटूथ हे तंत्रज्ञान 21 व्या शतकात बनवण्यात आले. पण त्याचा इतिहास 1990 च्या दशकातील आहे. ब्यू-टूथचे भाषांतर केले तर त्याचा अर्थ ‘निळा दात’ असा होतो.
पाण्याच्या बाटलीची एक्स्पायरी डेट किती असते? उत्तर जाणून तुम्हीही थक्क व्हाल
तुम्हाला वाचून आर्श्चय वाटेल की, ब्लूटूथ हे नाव कोणत्याही तंत्रज्ञानाशी संबंधित नाही तर एका राजाच्या नावावरून देण्यात आलं आहे. यात निळ्या दाताचा सुद्धा संबंध आहे, असा दावा काही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. ब्लूटूथ वेबसाइटने म्हटले की, ब्लूटूथ नाव मध्ययुगीन स्कॅन्डिनेव्हियन राजाच्या नावावर आहे. हॅराल्ड गोर्मसन असं या राजाचं नाव होतं. डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन देशांच्या राजांना स्कॅन्डिनेव्हियन राजे म्हटले जाते.
ब्लूटूथ हे नाव किंग हॅराल्ड गोर्मसन यांच्या नावावरून ठेवलं हे खरं आहे, पण ब्लूटूथच्या मालकाला आपल्या तंत्रज्ञानाचं नाव एका राजाच्या नावावरून ठेवायचं कसं सुचलं, असा प्रश्न पडला असेल. ब्लूटूथचे मालक जाप हार्टसेन हे एरिक्सन कंपनीत रेडिओ सिस्टीमचं काम करत होते. यावेळी एका ऐतिहासिक पुस्तकातून त्यांनी हॅराल्ड गोमर्सन राजाकडून प्रेरणा घेतली आणि आपल्या तंत्रज्ञानाला ब्लूटूथ नाव देण्याचा विचार केला. यादरम्यान एरिक्सन कंपनीसोबत नोकिया, इंटेलसारख्या कंपन्याही यावर काम करत होत्या. यावेळी या सर्व कंपन्यांनी मिळून स्वत;चा एक वेगळा गट तयार केला, त्याला एसआयजी ( Special Interest Group) असं नाव देण्यात आला.
काही रिपोर्टनुसार, हॅराल्ड गोमर्सन राजाचं डॅनिश भाषेतील नाव blátǫnn असं आहे. याचा इंग्रजीतील अर्थ ब्लूटूथ असा होतो. पण राजाचे नाव blátǫnn असे का ठेवले यामागेही एक कथा सांगितली जाते. इकॉनॉमिक टाइम्ससह काही वेबसाईटच्या माहितीनुसार, हॅराल्ड गोमर्सन राजाला ब्लूटूथ असे नाव देण्यात आले कारण त्याचा एक दात निळ्या रंगाचा दिसत होता. जो एकप्रकारे मृत अर्थात डेड दात होता. राज्याच्या याच निळ्या रंगाच्या दातावरून अर्थात ब्लूटूथवरूनचं ब्लूटूथ नाव पडले.
सुरुवातीला ब्लूटूथ हे फक्त टेक प्रोजेक्टसाठी प्लेसहोल्डर कोड नाव असायला हवे होते. पण आजवर ह्याच नावाने ते ओळखले जाते. यामुळे ब्लूटूथ आणि दाताचा संबंध जोडला जातो.