Earthquake in Delhi : काही दिवसांपासून देशाची राजधानी दिल्ली भूंकपामुळे हादरली आहे. दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के वारंवार जाणवत आहेत. रविवारीसुद्धा दिल्लीसह जवळपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे दिल्लीत सध्या भीतीचे वातावरण आहे.
दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवणे, ही बाब आताचीच नाही. यापूर्वीही अनेकदा दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तुम्हाला माहीत आहे का की, दिल्लीत भूकंपाचे धक्के वारंवार का जाणवतात? आज आपण या सविस्तर जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली शहर

राजधानी दिल्ली हे देशातील प्रमुख शहर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे सर्वांत मोठे शहर आहे. नोकरी, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने लाखो लोक दिल्लीत येतात. त्याशिवाय अनेक सरकारी मुख्यालये याच शहरात आहेत. सर्वांगीण दृष्ट्या विकसित असणाऱ्या या शहरावर भूकंपाचे सावट मात्र कायम आहे.

हेही वाचा : जगातील सर्वांत तिखट मिरची कोणती माहीत आहे? जिच्या चिमूटभर घासाने शरीर होईल बधीर

दिल्लीत भूकंपाचे धक्के वारंवार का जाणवतात?

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के वारंवार जाणवतात. त्यामागील कारण म्हणजे भारताच्या उत्तर भागात हिमाचल पर्वतरांग आहे. हे उंच पर्वत प्लेट्सपासून निर्माण झाले होते. या प्लेट्सला टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात. या टेक्टोनिक प्लेट्स जेव्हा जेव्हा सरकतात तेव्हा तेव्हा भूकंपाचे धक्के जाणवतात. दिल्ली हे शहर या फॉल्ट लाइनवर वसलेले आहे. त्यामुळे येथे भूकंपाचे धक्के वारंवार जाणवतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is delhi earthquake prone why is delhi facing so many earthquakes know the reason ndj