उद्या गणेश चतुर्थी आहे. सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू आहे. गणपती बाप्पा येणार म्हणून महाराष्ट्रासह सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. गणपतीच्या विविध आरत्या, गाणी तन्मयतेने म्हटली जातात. लोक सहज बोलतानाही ‘बाप्पा येणार आहे’, ‘बाप्पाच्या दर्शनाला यायचं हा’, ‘तुमचा बाप्पा कधी येणार?’ असं म्हणतात. गणपती या शब्दाला समानार्थी म्हणून बाप्पा या शब्दाचा प्रयोग होताना दिसतो. परंतु, बाप्पा हे गणपतीचे नाव नाही. मग बाप्पा हा शब्द गणपतीसाठी का योजण्यात आला? बाप्पा या शब्दाचा अर्थ काय ? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

गणपती ही आबालवृद्धांसाठी जिव्हाळ्याची देवता आहे. गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पासाठी सगळे जय्यत तयारी करत असतात. ‘आमचा बाप्पा’ ‘बाप्पाचे दर्शन’ असे सहज म्हटले जाते. ‘बाप्पा’ हा शब्द गणपतीसाठी पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो. परंतु, बाप्पा हे गणपतीचे नाव नाही. मग गणपतीला बाप्पा का म्हणतात ?

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
loksatta kalachi ganit Sankranti Eclipse Zodiac
काळाचे गणित: संक्रांतीची तिथी?
committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…
Technology Exponential Technology Linear Technology
पहिले पाऊल: आघातांकीय!
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Santosh Deshmukh murder case, Devendra Fadnavis ,
“आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

हेही वाचा : श्रीगणेशाला का प्रिय आहेत दुर्वा-शमी आणि मंदार ? गणपतीचा आणि पत्रींचा संबंध काय ?

हेही वाचा : गणपतीचे वाहन उंदीर का आहे? मोर हे गणेशाचे वाहन होते का ? जाणून घ्या कथा…

गणपतीला बाप्पा का म्हणतात ?

पुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. पुराण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पुराण साहित्यात गणपतीच्या विविध नावांचा उल्लेख आहे. महाभारत हा ग्रंथही गणपतीने लिहिला असे मानले जाते. गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक या शब्दाचाअर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचलित आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय. वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत.

हेही वाचा : गणपतीचा जन्म कधी झाला ? जाणून घ्या गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमध्ये फरक….


गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो.गणानाम गणपतीम् हवामहे… आणि विषु सीदा गणपते.. या ऋचांमध्ये गणपतीचा निर्देश करतात. परंतु, वैदिक गणपती हा ‘बाप्पा’ नव्हता. वैदिक गणपती आणि पौराणिक गणपती (सध्याचे गणेश रूप) यामध्ये भेद आहे.
एका संशोधनानुसार, भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रीकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळ अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे, हा दुसरा कयास लावण्यात येतो. इसवी सनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवी सनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळापासूनच या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली, असे अभ्यासक मानतात. गुप्त काळात गणपती देवता शुभ समजण्यात येऊ लागली. गुप्त काळानंतर गणेश पूजन हे प्रथम करण्यात येऊ लागले. या काळानंतर इ. स. १२-१३ व्या शतकानंतर गणपतीला बाप्पा म्हणण्यात येऊ लागले, अशी शक्यता आहे. परंतु, या शब्दाची लोकप्रियता आताच्या १८ व्या शतकानंतर वाढत गेली.

हेही वाचा : शास्त्रीय गणेशमूर्ती कशी असावी ? गणेशमूर्तींचे स्वरूप कसे असावे ? काय सांगते अथर्वशीर्ष…


बाप्पा हा शब्द मूळ मराठी नाही. प्राकृत भाषांमध्ये बाप्पा शब्द आढळतो. वडिलांना बाप्पा म्हणत असत. आजही उडिया, गुजराती भाषांमध्ये वडिलांना बाप्पा म्हणतात. ‘अरे बापरे’ या अर्थीही बाप्पा शब्द वापरण्यात येतो. बाप्पा हे आदरार्थी म्हटले जाते. वडिलांना असणारा मान या शब्दामध्ये आहे. गणपती ही सर्वांची अधिपती देवता असल्यामुळे ‘युनिव्हर्सल फादर’ हा अर्थ असणारा ‘बाप्पा’ हा शब्द वापरण्यात येऊ लागला. पुढे हा शब्द रूढ झाला. वडील या नात्यामध्ये आदर आणि आपुलकी असते. जिव्हाळा असतो. गणपती ही लडिवाळ भक्ती चालू शकणारी एक देवता आहे. यामुळे गणपतीला प्रामुख्याने बाप्पा म्हटले जाते. ‘देव’ या अर्थीसुध्दा ‘बाप्पा’ हा शब्द उत्तर भारतात वापरताना दिसतात.

Story img Loader