मे महिन्यामध्ये उन्हाचा प्रभाव सर्वात जास्त असतो. अशामध्ये बहुंताश लोक हे घराबाहेर पडणे टाळतात. पण घरामध्ये गरम होत असल्याने लोक कूलर, पंखा किंवा एसीचा वापर करत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये एअर कंडिशनरचा वापर वाढला आहे. आजकाल बऱ्याच घरांमध्ये एसी लावलेला पाहायला मिळतो. ऑफिसच्या ठिकाणीही एअर कंडिशनरची सोय असते. याशिवाय कॅफे, हॉटेल्स देखील एसीमुळे वातानुकूलित असतात. आतातरी एसी लोकल ट्रेन्ससुद्धा सुरु झाल्या आहेत.
सुरुवातीला एसीचा आकार खूप मोठा होता. आता आकारावरुन आणि फीचर्सवरुन एसीचे स्प्लिट एसी, विंडो एशी, पोर्टेबल एसी असे असंख्य प्रकार बाजारामध्ये उपलब्ध असतात. एसी वापरताना तुम्हाला ‘एसीची मशीन ही नेहमी पांढऱ्या रंगाचीच का असते?’ असा प्रश्न एकदातरी पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज देणार आहोत.
Air Conditioner चा रंग नेहमी पांढरा का असतो?
एअर कंडिशनरमधून थंड हवा येत असते. घरातील किंवा खोलीतील वातावरण गार व्हावे यासाठी एसीचा वापर केला जातो. एसीची मशीन सतत सुरु असल्यास त्यावर लोड येऊ शकतो. हे उपकरण तापल्यावर खराब होऊ शकते. उन्हाळ्यात सूर्यकिरणे जास्त प्रभावी असतात. ही किरणे पांढऱ्या रंगाकडे कमी प्रमाणात अवशोषित होत असतात. सूर्यकिरणांचा प्रभाव होऊन एसीच्या मशीनवर येऊन तो गरम होऊ नये यासाठी तो पांढऱ्या किंवा अन्य रंगाच्या हलक्या छटांमध्ये असतो. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात उकडू नये यासाठी आपण पांढरे कपडे घालतो अगदी त्याच हिशोबाने एसीला पांढरा रंग दिला जातो.
आणखी वाचा – Refrigerator मध्ये फ्रीजर हा नेहमीच वरच्या बाजूला का असतो? जाणून घ्या..
विंडो एसी हा एका यूनिटवर काम करत असतो. घरात किंवा खोलीत खिडकीजवळ हा एसी लावेला असतो. या एसीच्या रंगामध्ये ऑप्शन नसतात. तो फक्त पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. स्प्लिट एसी दोन यूनिट्समध्ये विभागलेला असतो. या एसीचा जो भाग घराच्या बाहेर असतो, तो पांढऱ्या रंगाचा असतो. घराच्या आत असणारी स्प्लिट एसीची मशीनच्या रंगामध्ये ग्राहकांना पर्याय मिळतात.