Wedding Ring Finger Fact: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. हिंदू रितीरिवाजानुसार लग्नाचे सर्व विधी साखरपुडा समारंभाने सुरू होतात. साखरपुड्यात वर आणि वधू एकमेकांना अंगठी घालतात. तुम्ही पाहिले असेल की जेव्हा जोडपे एकमेकांना अंगठी घालतात तेव्हा ते हाताच्या चौथ्या बोटात म्हणजेच अनामिकामध्ये घालतात. साखरपुडा असो वा लग्न असो किंवा प्रेमाची कबुली असो, लोक बहुतेक डाव्या हाताच्या चौथ्या बोटात अंगठी घालतात. पण, यामागे नेमकं कारण काय? या बोटातचं अंगठी का घातली जाते? चला तर मग जाणून घेऊया यामागचे रंजक कारण.
लोकं काय मानतात?
इनसाइडर वेबसाइटच्या अहवालानुसार, सुमारे ६००० वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्तमध्ये अंगठी घालण्याची सुरुवात झाली. त्यानंतर अंगठी घालण्याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या, ज्या आजही सुरू आहेत. मग इजिप्शियन लोकांचा असा विश्वास होता की लव्हर्स व्हेन नावाची एक रक्तवाहिनी माणसाच्या अनामिकेतून थेट हृदयात जाते. याचा अर्थ असा की या बोटाची तार थेट हृदयाशी जोडली जाते. असा त्यांचा विश्वास होता. तेव्हा कदाचित हाताची सगळी बोटं हृदयाशी जोडलेली असतात हे त्याला माहीत नसावं. या कारणामुळे लोक या बोटात अंगठी घालू लागले.
अनेक धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत..
ख्रिश्चन धर्माव्यतिरिक्त असे अनेक धर्म आहेत, ज्यामध्ये अंगठी घालणे आवश्यक नाही आणि असेल तर ती केवळ चौथ्या बोटात घालावी असे बंधनकारक नाही. उदाहरणार्थ, यहूदियांमध्ये लग्नाच्या विधीनंतर, अंगठी दुसऱ्या बोटात हलविली जाऊ शकते आणि समारंभात ही अंगठी दुसऱ्या बोटात घातली जाते. इस्लाम धर्मात अंगठी घालण्याची सक्ती नाही. मात्र, भारत परदेशातील परंपरा झपाट्याने स्वीकारत आहे आणि लोकांनी लग्नापूर्वी रिंग सेरेमनीही करायला सुरुवात केली आहे.
( हे ही वाचा; भारतातील ‘या’ रहस्यमय दरीत गेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही; ठिकाणाचे नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क)
अनामिकेत बोटात अंगठी घालण्याची परंपरा..
लग्नात अंगठी घालण्याची आणि अनामिकेत अंगठी घालण्याची प्रथा देखील इजिप्शियन लोकांनी सुरू केली होती. पण, अंगठी कोणत्या बोटात घालायची यावरून ब्रिटनमध्ये ४५० वर्षांपूर्वी चर्चा सुरू झाली होती. १५४९ मध्ये, अँग्लिकन चर्चने स्वतःला कॅथोलिक चर्च आणि त्यांच्या मान्यतेपासून वेगळे केले. यासोबतच त्यांनी आपल्या पद्धतीही बदलल्या. कॅथोलिक चर्चच्या मते अंगठी उजव्या हाताच्या चौथ्या बोटात घालायला हवी, तर अँग्लिकन चर्चने ती डाव्या हाताच्या चौथ्या बोटात घालायला सुरुवात केली आणि हळूहळू ही प्रथा रूढ झाली.