प्रत्येक व्यक्तीच्या डाएटमध्ये केळ्यांचा समावेश असतोच. लहान मुलांचे तर हे आवडते फळ असते. त्यामुळे प्रत्येक घरात केळी हे फळ असतेच. आपण अनेकदा केळी खातो, पण त्याच्या आकाराबाबत आपल्याला फारसे आश्चर्य वाटत नाही. काही गोष्टी नैसर्गिकरित्याच तशा असतात, हे आपण मान्य केले आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा आकार तसा का आहे याबाबत आपण निसर्ग हे उत्तर ठरवतो. याप्रमाणेच केळ्यांचा आकारही सरळ नसुन वाकडा का असतो यामागे नैसर्गिक कारण आहे.
केळ्यांचा आकार सरळ नसतो, तर तो नेहमी वक्र किंवा वाकडा असतो. यामागे काय कारण आहे जाणून घ्या.
केळ्यांचा आकार वाकडा का असतो?
इतर फळांप्रमाणे केळीही झाडावर येतात. आधी फुल येतात आणि त्या पाकळ्यांमधून केळी उगवतात. जेव्हा केळी आकाराने मोठी होतात, तेव्हा ‘निगेटिव्ह जियोट्रॉपिझम’ या प्रक्रियेतून त्यांची वाढ होते. ज्याचा अर्थ ते जमिनीच्या दिशेने न वाढता, सुर्यप्रकाशाच्या दिशेने म्हणजेच वरच्या दिशेने वाढतात. त्यामुळे त्यांचा आकार वक्र किंवा वाकडा होतो. या कारणामुळेच केळ्यांचा आकार सरळ नसुन वाकडा असतो.