Nicknames Of Indian Cities: भारतात २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात असलेल्या या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शहरे आहेत, जी त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय आहेत. त्यातील काही शहरांमध्ये अजूनही समृद्ध इतिहास, भौगोलिक प्रदेश आणि स्थानिक वैशिष्ट्ये आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका शहराबद्दल सांगणार आहोत, ज्याला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते.

भारतातील मिनी इंडिया

भारतातील विविध शहरांची वेगवेगळी खासियत आहे. देशाची राजधानी दिल्लीला मिनी इंडियादेखील म्हटले जाते, ज्याचा स्वतःचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि खाद्यपदार्थ आहेत.

दिल्लीला ‘मिनी इंडिया’ का म्हणतात?

परंतु देशात समृद्ध इतिहास आणि संस्कृती असलेली वेगवेगळी शहरे असताना फक्त दिल्लीलाच ‘मिनी इंडिया’ का म्हटले जाते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु, दिल्ली हे एक असे शहर आहे, जिथे तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक सापडतील. जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंतचे लोक येथे उपस्थित आहेत. याचे एक कारण म्हणजे केंद्र सरकारची सर्व प्रमुख कार्यालये फक्त नवी दिल्लीत आहेत. देशभरातील लोक या कार्यालयांमध्ये काम करतात आणि त्यांच्या कुटुंबासह नवी दिल्ली परिसरात राहतात.

त्याशिवाय देशभरातील व्यापारीदेखील व्यवसायासाठी दिल्लीच्या बाजारपेठेत येतात. अशा परिस्थितीत येथे तुम्हाला दिल्लीत देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोक भेटतील.

सर्व सण साजरे केले जातात

दिल्ली हे एक असे शहर आहे जिथे होळी, दिवाळी, ईद, बैसाखी, ओणम, पोंगल, बिहू, विशू, लोहरी, गणेश चतुर्थी, मकर संक्रांत, रथयात्रा इत्यादी सण साजरे केले जातात.