काही महिन्यांपूर्वी सोशल नेटवर्किंगवर जेसीबी की खुदाई हा ट्रेण्डींग टॉपिक होता. अनेकांनी जेसीबीसंदर्भातील विनोद या ट्रेण्डदरम्यान पोस्ट केले होते. अनेकांनी केलेल्या मजेशीर ट्विटमुळे अनेकदा नजरेआड जाणारा जेसीबी चांगलाच चर्चेत आला. मात्र या जेसीबीचा रंग पिवळाच का असतो असं तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊयात यामागील कारण…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुळात आपण सामान्यपणे खोदकाम करणाऱ्या वाहनांना जेसीबी असं संबोधतो. खरं जेसीबी हा वाहनांचा प्रकार नसून खोदकाम करणाऱ्या वाहनांची निर्मिती करणारी एक कंपनी आहे. खोदकाम श्रेत्रातील वाहननिर्मिती करणारी जगातील सर्वात लोकप्रिय असणारी कंपनी ही मूळची युनायटेड किंगडममधील आहे. जोसेफ सिरिल बमफोर्ड असा जेसीबीचा फूलफॉर्म होतो. या कंपनीचे मुख्यालय इंग्लंडमधील स्टाफर्डशायर येथे आहे. १९४५ मध्ये युद्ध वहाने बनवाच्या अतिरिक्त सामानामधून पहिले मशीन ज्याला टिपिंग ट्रेलर बनवले होते. त्यावेळेला माल वाहून नेण्यासाठी बनवलेली ही मशीन जेसीबीने ४५ पौंडला विकली होती.

अवघ्या सहा लोकांसहीत सुरु झालेली ही कंपनी आज चार खंडांमध्ये पसरली असून ११ हजारहून अधिक कर्मचारी या कंपनीमध्ये काम करतात. मालवाहू गाडीपासून सुरुवात करणाऱ्या या कंपनीने मजल दरमजल करत या श्रेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले. या श्रेत्रात कोणी स्पर्धक नसल्याने खोदकाम करणाऱ्या गाड्या म्हणजे जेसीबी असा नावलौकिकच तयार झाला. आज भारतामध्येही जेसीबी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मात्र हे पिवळ्या रंगाचेच का असतात असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

आता जेसीबीचा रंग पिवळा का असतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी रंग आणि त्यांच्या तरंगलांबीबद्दल (wave length) जाणून घेणं गरजेचं आहे. तरंगलांबीचा विचार केल्यास विबग्योर VIBGYOR पट्ट्यांमध्ये पिवळ्याची रंगाची तरंगलांबी ५७० नॅनोमीटर इतकी आहे. केशरी रंगाची तरंगलांबी ५९० नॅनोमीटर इतकी आहे तर लाल रंगाची ६२० नॅनोमीटर इतकी आहे. VIBGYOR मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना तरंगलांबी वाढत जाते. तरंगलांबी अधिक असणारे रंग लांबूनही अधिक स्पष्टपणे दिसतात. म्हणजेच निळ्या (B) रंगापेक्षा पिवळा (Y) आणि पिवळ्यापेक्षा लाला (R) अधिक स्पष्टपणे दिसतो.

याच कारणामुळे जेसीबी आणि अन्य अवजड वहाने लांबून दिसावी या उद्देशांने त्यांना पिवळा रंग दिला जातो. केवळ जेसीबीच नाही तर खाणकामासाठी वापरले जाणारे मोठ्या आकाराचे ट्रक, डांबरीकरणासाठी वापरले जाणारे रोलर अशी सार्वजनिक बांधकामासाठीची वाहाने पिवळ्या रंगाचीच असतात. अशी वहाने अनेकदा रस्त्याच्या बाजूला कामासाठी वापरली जातात. त्यामुळे रस्त्यावरुन वेगात जाणाऱ्या वाहन चालकांना लांबूनच ती दिसावी ज्यामुळे ते वेग कमी करुन सुरक्षितपणे प्रवास करु शकतील असा यामागील मूळ उद्देश असतो. अग्निशमन दलाच्या गाड्यांसाठीही हाच नियम लागू होतो. लाल रंगाच्या गाड्या खूप लांबून नजरेस पडतात. त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी येताना तिला इतर वाहन चालकांनी तातडीने रस्ता खाली करु देणे अपेक्षित असते. म्हणूनच अग्निशमन दलाच्या गाड्यांना लाल रंग दिला जातो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why jcb is in yellow and fire brigade is read in colour scsg