आजच्या घडीला जगभर १२ महिन्यांची दिनदर्शिका वापरली जाते. ज्यामध्ये ३० आणि ३१ दिवसांचे महिने एका पाठोपाठ आलेले दिसतात. परंतु, फेब्रुवारी हा २८ दिवसांचा तर जुलै आणि ऑगस्ट हे पाठोपाठ ३१ दिवसांचे महिने आलेले दिसतात. तसेच आता १२ महिन्यांची असणारी दिनदर्शिका पूर्वीच्या काळी १० महिन्यांची होती. यामागचा इतिहास समजून घेणे अधिक रंजक ठरेल…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१० महिन्यांच्या दिनदर्शिकेचा काय आहे इतिहास

प्राचीन रोमन लोक खूपच व्यावहारिक होते. अनावश्यक गोष्टींसाठीची तरतूद त्यांना मान्य नव्हती. त्यांनी वर्षाची सुरुवात वसंत ऋतूत मानली. त्यांची दिनदर्शिका ही मार्च महिन्यापासून सुरू होत असे आणि डिसेंबर महिन्यात संपत असे. डिसेंबर हे नाव लॅटिन शब्द ‘डिसेन’ यावरून आले आहे. ‘डिसेन’ म्हणजे ‘दहा.’ मार्चपासून वर्ष सुरु होई. त्यामुळे दहावा महिना म्हणजे ‘डिसेन’ डिसेंबर असे. तेव्हा ३०४ दिवसांचे वर्ष होते. रोमन वर्षात १० महिने आणि ८-९ दिवसांचे अंदाजे ३८ आठवडे होते. परंतु, डिसेंबर ते मार्चमधील काळ अनामिक राहत असे. तसेच हे ३०४ दिवस सौरवर्षाशी जुळत नसे. हा काळ अधिक हिवाळ्याचा असे. रोमन लोकांसाठी उदासीन म्हणजे काही कार्य न करता येण्यासारखा होता. परंतु, नुमा नावाच्या रोमन राजाने ऋतूंच्या मानाने दिनदर्शिकेची रचना चुकीची आहे, असे मत मांडले. त्याने या काळाला नाव देण्याचे ठरवले. जॅनस देवावरून जानेवारी हे नाव, तर ‘टू प्युरीफि’ या शुद्धीकरणाच्या उत्सवावरून फेब्रुवारी हे नाव मिळाले.

कोण होता ज्युलियस आणि ऑगस्टस

ज्युलियस सीझर हा एक रोमन राजकारणी आणि लष्करी सेनापती होता, ज्याने रोमन प्रजासत्ताकाचा नाश आणि रोमन साम्राज्याच्या उदयास कारणीभूत असलेल्या घटनांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ज्युलियसने एक ज्युलियन कॅलेंडर तयार केले, ज्यामध्ये फेब्रुवारी वगळता प्रत्येक महिन्यात ३१ आणि ३० दिवस होते. त्याच्या स्मरणार्थ ‘जुलै’ महिन्याची निर्मिती करण्यात आली. ज्युलियसचा पुतण्या ऑगस्टस सीझर आहे. ऑगस्टसच्या स्मरणार्थ त्याच्या ज्येष्ठ काकांच्या नंतरचा महिना त्याच्यासाठी नियोजित करण्यात आला.

हेही वाचा : विश्लेषण : विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते ? काय आहे विठ्ठल देवतेचा इतिहास

जुलै आणि ऑगस्ट महिने ३१ दिवसांचे का असतात ?

सुरुवातीला रोमन कॅलेंडरमध्ये फक्त दहा महिने असायचे. कॅलेंडरची सुरुवात मार्चमध्ये येणाऱ्या वसंत ऋतूपासून होत असे. शेवटचा महिना डिसेंबर असायचा. डिसेंबरनंतरच्या कालावधीला कोणतेही नाव देण्यात आले नव्हते. तो फक्त हिवाळ्याचा काळ म्हणून ओळखला जात असे. त्यानंतर त क्रमाने हिवाळा कालावधी जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन महिने नियुक्त केले गेले.
इसवी सन ४५ पूर्वी ज्युलियस सीझरने ज्युलियन कॅलेंडर सुरू करून त्यात सुधारणा केली. याची सुरुवात जानेवारीपासून झाली आणि डिसेंबरमध्ये संपली. प्रत्येक विषम महिना ३१ दिवसांचा होता आणि सर्व सम क्रमांकित महिने ३० दिवसांचे होते, फेब्रुवारी तीन वर्षांत २९ दिवसांचा आणि चौथ्या वर्षात एकदा ३० दिवसांचा होता. त्यामुळे सरासरी ३६५.२५ दिवस प्रतिवर्ष होते. परंतु, वास्तविक वर्ष (सौर वर्ष) पेक्षा १२८ वर्षांच्या कालावधीत तो एक दिवस कमी होता. त्यामुळे इस्टरची खरी तारीख मोजण्यात अडचणी निर्माण झाल्या. १५८२ मध्ये त्याची जागा ग्रेगोरियन कॅलेंडरने घेतली. ग्रेगोरियन कॅलेंडर ४०० वर्षांच्या कालावधीत सरासरी ३६४.२४२ दिवसांचे असते.मात्र, सध्या पृथ्वीला सूर्याची एक फेरी काढण्यासाठी ३६५.२४२१९ दिवस लागतात.

फेब्रुवारी हा वर्षाचा शेवटचा महिना असल्याने सर्व समायोजने फक्त ३६५ दिवसांचे वर्ष करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये केली जायची. आधीच फेब्रुवारीमध्ये २९ दिवसांची रचना होती. ज्युलियन कॅलेंडरमध्ये जुलै (ज्युलियस) ३१ दिवसांचा आणि ऑगस्ट ३० दिवसांचा होता. ऑगस्टला Sextilis सहावा महिना म्हटले जायचे. कारण, रोमन साम्राज्यात १० महिन्यांचे वर्ष होते. तेव्हा तो फक्त सहावा महिना असायचा. इसवी सन पूर्व ८ मध्ये सेक्स्टिलिसचे सम्राट ऑगस्टसच्या सन्मानार्थ नाव ‘ऑगस्टस’ असे ठेवण्यात आले. जेव्हा ऑगस्टसला त्याच्या नावावर महिना होता, तेव्हा त्याचा महिना ३१ दिवसांचा असावा, अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्याने फेब्रुवारीमधला एक दिवस काढला, तो ऑगस्टसमध्ये जोडला आणि त्यानंतरच्या महिन्यांची लांबी ३० दिवस आणि ३१ दिवस आळीपाळीने जोडली.इजिप्शियन दिनदर्शिकेला डोळ्यांसमोर ठेवून रोमन दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आली होती.

रोमन साम्राज्याचा परिणाम दिनदर्शिकांवर झालेला दिसतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why july and august are consecutive months of 31 days why was there a 10 month calendar earlier vvk