आपण विविध प्रकारची औषधे घेत असतो. औषधे तयार करण्याची पद्धत आणि खाण्याची पद्धतही भिन्न आहे. पण, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? की बहुतेक औषधांच्या पॅकिंगमध्ये फक्त ॲल्युमिनियम फॉइलचे आवरण वापरले जाते. ते पाहून तुम्हाला कधी असाही प्रश्न पडला असेल की, ही औषधे फक्त ॲल्युमिनियम फॉइलमध्येच का पॅक केली जातात? तुमच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ॲल्युमिनियम फॉइलमध्ये औषधे पॅक केल्यास ती खराब होत नाहीत आणि त्यांची रचना समान राहते. ही औषधे अशा प्रकारे पॅक केली जातात की, ॲल्युमिनियम फॉइलच्या पॅकेटमधून औषधे काढण्यासाठी थोडासा जोर लावावा लागतो, तरच ती बाहेर येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकारच्या विशेष पॅकेजिंगमुळे औषधे खराब न होता, ती कालबाह्यतेच्या तारखेपर्यंत (expiration date) सुरक्षित राहतात आणि त्यांचा प्रभावही टिकून राहतो. अनेक औषधे अशी आहेत की, जी उघड्यावर ठेवल्यास खराब होऊ शकतात किंवा हवेच्या संपर्कात आल्यावर ती निरुपयोगी ठरू शकतात. म्हणूनच ती ॲल्युमिनियम फॉइलमध्ये हवाबंद केली जातात. पण, या औषधांचे पॅकिंग ॲल्युमिनियम फॉइलमध्येच का केले जाते याचे कारण समजून घेऊ

हेही वाचा – मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी का म्हटलं जातं? 

ॲल्युमिनियम फॉइल का वापरली जाते?

बहुतांशी औषधे रसायनांपासून बनविली जातात; जी कधी कधी मानव किंवा पर्यावरणाद्वारे थेट वापरासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळेच डॉक्टरांनी लिहून दिल्यावरच ती घ्यावीत, असे काही औषधांवर लिहिलेले असते. अशा परिस्थितीत त्यांचे चांगल्या रीतीने पॅकिंग केले जाणे खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच चांगल्या पॅकिंगसाठी ॲल्युमिनियम ही सर्वांत योग्य गोष्ट आहे. कारण- त्याचे गुणधर्म अद्वितीय आणि विशेष आहेत.

त्याची सर्वांत पहिली गुणवत्ता म्हणजे ते गंजत नाही आणि तापमान व आर्द्रतेतील सततचे बदल सहजपणे सहन करू शकते. म्हणजे कोणतेही औषध ॲल्युमिनियम धातूमध्ये पॅक केलेले असेल, तर त्यावर हवेतील ओलाव्याचा परिणाम होणार नाही. त्याचबरोबर जर कागदाच्या पाकिटात औषध ठेवले, तर आर्द्रतेच्या संपर्कात येताच ते खराब होते. त्याव्यतिरिक्त ते अतिनील किरण, पाण्याचे थेंब, तेल, फॅट्स, ऑक्सिजन आणि इतर सूक्ष्म जंतूंपासून औषधांचे संरक्षण करते.

हेही वाचा – ‘जानेवारी’ नाव कोणत्या देवावरून ठरलं? कोणत्या देशात अद्याप नवीन वर्ष झालेलं नाही, ‘या’ १० प्रश्नांची उत्तरे देऊ शकता का?

त्याशिवाय ॲल्युमिनियम हा एक असा धातू आहे; ज्याची कोणत्याही गोष्टीसह सहजपणे प्रक्रिया होत नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why medicines are packed only in aluminium foil covers here is the reason snk