How To Apply For Minor PAN card : पॅन कार्ड हे प्रौढांसाठी एक महत्त्वाचे कागदपत्र (डॉक्युमेंट) आहे. कारण- त्याचा वापर टॅक्स (कर), बँकिंगसंबंधित अनेक कामे, व्यवसाय इत्यादींसाठी केला जातो. पण, काही ठिकाणी १८ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या अल्पवयीन मुलांकडेसुद्धा पॅन कार्ड असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ- एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला एसआयपी किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरू करायची असल्यास किंवा त्याला शिष्यवृत्तीची आवश्यकता असल्यास, त्यांना पॅन कार्ड आवश्यक असणार आहे. तसेच काही वेळा जर पालकांना त्यांच्या मुलांच्या वतीने गुंतवणूक सुरू करायची असेल, तेव्हासुद्धा त्यांच्या मुलांकडे पॅन कार्ड असणे आवश्यक असते.

तर, तुम्हालाही तुमच्या अल्पवयीन मुलांचे पॅन कार्ड काढायचे आहे का? त्यासाठी अर्ज कसा करायचा? यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा…

१. गूगलवर ‘nsdl’ सर्च करा आणि ‘ऑनलाइन पॅन ॲप्लिकेशन’ अशी पहिली लिंक दिसेल ती उघडा.

Saif Ali Khan attacker hid in garden of actors building
सैफवर हल्ला केल्यावर दोन तास त्याच इमारतीत होता आरोपी, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “त्याने त्याच्या भावाला…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kerala woman sentenced to death for poisoning her boyfriend
प्रियकराला विष दिल्याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीला फाशीची शिक्षा; कोण आहे ग्रीष्मा एसएस? नेमके प्रकरण काय?
What is the importance of KYC for instant loans?
Instant Loan : बँकांकडून झटपट कर्ज कसं मिळतं? यासाठी केवायसीची भूमिका काय असते?
iitian baba abhey singh mahakumbh 2025
महाकुंभ मेळ्यातील आयआयटी बाबा अभय सिंहची जुना आखाड्यातून हकालपट्टी; कारण काय?
Donald Trump Oath Ceremony Updates in Marathi| Donald Trump taking the presidential oath 2025
Donald Trump Oath Ceremony: आता अमेरिकेत तृतीयपंथींना मान्यता नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; सर्व अर्जांवर फक्त स्त्री व पुरुष एवढेच पर्याय!
Image Of Donald Trump
Donald Trump : राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच ‘या’ दोन देशांना ट्रम्प यांचा दणका, फेब्रुवारीपासून आकारणार २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क
Eknath Shinde in Satara Dare Village on Maharashtra Government| Eknath Shinde said I am not Upset with Maharashtra Government
मी नाराज नाही – एकनाथ शिंदे

२. पॅन ॲप्लिकेशन फॉर्म उघडल्यानंतर टाइप मेनूमधून ‘New PAN- Indian Citizen ( (फॉर्म 49A)’ हा पर्याय निवडा. कॅटेगिरी ड्रॉप डाउन मेनूमधून ‘Individual’ हा पर्याय निवडा.

३. त्यानंतर तुमचे नाव, जन्मतारीख आणि ईमेल आयडी ही माहिती भरून घ्या.

४. तुमची परवानगी द्या आणि पुढे जाण्यासाठी कॅप्चा बारवर क्लिक करा.

५. त्यानंतर तुमचा टोकन नंबर जनरेट होईल, तो स्वतःजवळ नीट जपून ठेवा.

६. ‘कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म’वर क्लिक करा. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या पर्यायांमधून, ‘Forward application documents physically’ हा पर्याय निवडा. कारण- ते मायनर पॅन कार्ड आहे.

७. तुम्हाला पॅन कार्डची प्रत (झेरॉक्स) हवी आहे की नाही ते निवडा आणि नावासह तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक टाईप करा.

८. तुमची माहिती या खालील विभागात प्रीफिल्ड (prefilled) केली जाईल. सर्व माहिती बरोबर आहे का ते तपासा आणि लिंग (Gender) निवडा.

९. तुम्हाला इतर कोणत्याही नावाने ओळखले गेले आहे का? या प्रश्नाचे उत्तर होय/नाही या उत्तरासह द्या.

१०. तुमच्या पालकांची माहिती भरा. फक्त आईच असेल, तर तुम्ही येथे दिलेल्या पॅन कार्डवर तिचे नाव छापण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. अन्यथा, फक्त तुमच्या पालकांची माहिती भरा आणि तुम्हाला पॅन कार्डवर कोणत्या पालकाचे नाव छापायचे आहे ते निवडा.

११. ‘Next’वर क्लिक करा. नंतर मेनूमधून ‘No income’ हा पर्याय निवडा आणि तुमचा पत्ता भरा. खाली स्क्रोल करा आणि नंतर तुमचा नंबर लिहा.

१२. रिप्रेझेंटेटिव्ह असेसी (Representative Assessee) पर्यायामध्ये ‘Yes’ सिलेक्ट करा. कारण- हे मायनर पॅन कार्ड काढणाऱ्यांसाठी आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या पालकांची (आई किंवा वडील) माहिती भरू शकता.

१३. ‘Indian Citizen’वर क्लिक करा आणि तुमचे राज्य, शहर, क्षेत्राचे नाव टाईप करा.

१४. ‘Next’वर क्लिक करा आणि तुम्हाला सबमिट करायचे असलेले आयडी पुरावे निवडा. अल्पवयीन मुलांच्या बाबतीत तीनही विभागांसाठी आधार हा सर्वोत्तम पर्याय आहे.

१५. डिक्लरेशन (declaration) भरा आणि नंतर ‘सबमिट’वर क्लिक करा.

१६. त्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल. एकदा संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर, एक Aadhaar authentication असा पर्याय तुम्हाला दिसेल. तिथे फक्त तुमचा आधार क्रमांक भरा आणि authentication करा.

त्यानंतर तुमचे पॅन कार्ड तयार झाल्यावर ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल.

Story img Loader