चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आज एक खूप चांगली ऑफर आहे. आज (२० सप्टेंबर) चित्रपट रसिकांना अवघ्या ९९ रुपयांत चित्रपट पाहता येणार आहे. आज ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ (National Cinema Day) साजरा केला जात आहे, त्यामुळे चित्रपटाच्या किमतीत सूट देण्यात आली आहे. तुम्ही आज चित्रपट पाहायला जाण्याचा विचार करत असाल तर ऑनलाइन तिकीट कसे बूक करायचे, ते जाणून घ्या.

राष्ट्रीय चित्रपट दिन का साजरा केला जातो?

‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, २०२२ मध्ये मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे (MAI) राष्ट्रीय चित्रपट दिनाची सुरुवात करण्यात आली. करोनाच्या साथीनंतर चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्यामुळे एमआयएने या खास दिवसाची सुरुवात केली. त्यांनी या दिवशी चित्रपटाच्या तिकिटांवर मोठी सवलत देण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून प्रेक्षक मोठ्या प्रमाणात चित्रपट पाहायला येतील. करोना काळात सिनेमा हॉल मालकांचे मोठे नुकसान झाले होते, त्यांच्या मदतीसाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Radhika Apte Movies on OTT (1)
मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलीवूड चित्रपटांमध्ये केल्यात बोल्ड भूमिका, कुटुंबासह पाहता येणार नाहीत तिचे OTT वरील ‘हे’ सिनेमे
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Stree 2
श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ चित्रपटाचा ३१व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ‘इतक्या’ कोटींची केली कमाई
actor akshay kumar accounced his new upcoming movie bhoot bangala on his birthday
तब्बल १४ वर्षांनी अक्षय कुमार, प्रियदर्शन एकत्र करणार काम; अभिनेत्याच्या वाढदिवशी नवीन चित्रपटाची घोषणा, पोस्टर प्रदर्शित
Akhil Akkineni net worth
९ वर्षांचे करिअर अन् फक्त एकच हिट चित्रपट, तरीही कोटींमध्ये फी घेतो अभिनेता; ‘या’ अभिनेत्याचा आहे सावत्र भाऊ
Fahadh Faasil
फहाद फासिल बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण, ‘या’ दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार
Hemant Dhome will soon announce a new marathi Movie
‘झिम्मा २’नंतर हेमंत ढोमेचा लवकरच येणार नवा चित्रपट, अभिनेत्याने स्वतःच्या गावात अन् शेतात केलंय चित्रीकरण
tujhe meri kasam genelia and riteish deshmukh evergreen movie
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! टीव्हीवर एकदाही न दाखवलेला रितेश-जिनिलीयाचा चित्रपट तब्बल २१ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार

‘नवरा माझा नवसाचा २’ ते ‘हे’ चित्रपट पाहता येणार फक्त ९९ रुपयांत, चित्रपटप्रेमींसाठी खास ऑफर; काय आहे निमित्त?

कोणत्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बुकिंग करायचे?

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. २० सप्टेंबरला कोणत्याही चित्रपटाचे ९९ रुपयांचे तिकीट बुकिंग तुम्ही BOOKMYSHOW, पीव्हीआर सिनेमा, पेटीएम, INOX, सिनेपोलिस, कार्निव्हल यापैकी एखादा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरून करू शकता.

पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता काय? ऑनलाइन अन् ऑफलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

तिकीट बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया

  • बुकिंग ॲप किंवा वेबसाइटवर जा : जसे की BookMyShow किंवा Paytm.
  • लोकेशन निवडा : तुमचे जवळचे स्थान निवडा.
  • चित्रपट निवडा : २० सप्टेंबर रोजी तुमचा आवडता चित्रपट निवडा.
  • तिकीट बुक करा : ‘बुक तिकीट’ बटणावर क्लिक करा, जिथे तुम्हाला ९९ रुपयांची ऑफर दिसेल.
  • सीट निवडा : (९९ रुपयांवर चित्रपटाचे तिकीट बुकिंग) तुमच्या आवडीची जागा निवडा आणि पेमेंट पेजवर जा.
  • पेमेंट करा : पेमेंट पूर्ण झाल्यावर, तुमचे तिकीट कन्फर्म होईल आणि तुम्हाला एक ई-तिकीट मिळेल.
  • ऑनलाइन बुकिंग केल्यास चित्रपटांची ही तिकिटं ९९ रुपयांमध्ये उपलब्ध असतील, पण काही अतिरिक्त शुल्क (जसे की कर, हाताळणी शुल्क) लागू होऊ शकतात, जे सिनेमागृहांनुसार वेगवेगळे असू शकते.

‘आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन कसे काढायचे? मोफत उपचार कोणत्या आजारांवर होतात, योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या

कोणते चित्रपट ९९ रुपयांत पाहता येणार?

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त ‘स्त्री २’, ‘युध्रा’, ‘कहाँ शुरू कहाँ खत्म’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘नेव्हर लेट गो’, ‘ट्रान्सफॉर्म्सस वन’, ‘द बकिंगहम मर्डर्स’, असे चित्रपट ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहेत.

(संपादन: विजय पोयरेकर)