Postmortem Fact: पोस्टमॉर्टम म्हणजे काय हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल. एखाद्या व्यक्तीचा अपघात, आत्महत्या किंवा खून झाला की मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी डॉक्टर आणि फॉरेन्सिक टीम त्या व्यक्तीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करतात. कोणत्याही मृत व्यक्तीचे पोस्टमॉर्टम करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या नातेवाइकांची परवानगी घेतली जाते. तसे, पोस्टमॉर्टम हे देखील एक प्रकारचे ऑपरेशन आहे, ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या शरीराची तपासणी करून मृत्यूचे खरे कारण शोधले जाते. यामध्ये एक मनोरंजक गोष्ट म्हणजे पोस्टमॉर्टेम हे नेहमी रात्री न करता दिवसा केले जाते. तर असं करण्यामागचे नेमके कारण काय? तर या प्रश्नाचे उत्तर आज जाणून घेऊया…
पोस्टमार्टम का केले जाते?
पोस्टमॉर्टम हे फक्त एक प्रकारचे ऑपरेशन आहे. यामध्ये मृतदेहाची चाचणी केली जाते. मृत्यूचे नेमके कारण कळावे म्हणून ही चाचणी केली जाते. विशेष म्हणजे पोस्टमॉर्टसाठी मृताच्या नातेवाईकांची परवानगी महत्वाची असते. तसच अशी देखील काही प्रकरणे असतात ज्यात पोलीस अधिकारी देखील पोस्टमॉर्टम करण्याची परवानगी देतात, जसे की खुनाच्या प्रकरणात.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या १० तासांनंतर शरीरात बदल होऊ लागतात. रिपोर्ट्सनुसार, व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६ ते १० तासांच्या आत पोस्टमॉर्टम केले जाते, कारण यापेक्षा जास्त वेळानंतर मृतदेह आणि स्नायूंमध्ये नैसर्गिक बदल होतात.
रात्री पोस्टमॉर्टम का करू नये?
मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्याची वेळ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत असते. या आधी किंवा नंतर पोस्टमॉर्टम केले जात नाही. वास्तविक, असे करण्यामागील कारण म्हणजे रात्रीच्या वेळी ट्यूबलाइट किंवा एलईडीच्या प्रकाशात जखमेचा रंग लाल ऐवजी जांभळा दिसतो आणि फॉरेंसिक साइंसमध्ये जांभळ्या रंगाच्या जखमेचा कोणताही उल्लेख नाही आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशात जखमेचा रंग वेगळा असल्याने पोस्टमॉर्टम अहवालाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते.
( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील सर्वात लहान देश; राहतात फक्त ८०० लोकं)
याशिवाय रात्री पोस्टमॉर्टम न करण्यामागे धार्मिक कारणही सांगितले जात आहे. अनेक धर्मांच्या प्रथांनुसार रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार केले जात नाहीत. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी ते आपल्या मृत व्यक्तीचे पोस्टमॉर्टम करत नाही.