Why power banksnot allowed in checked luggage : जर तुम्ही तुम्ही नियमित विमान प्रवास करीत असाल, तर तुम्हाला कधीतरी तुमच्या ‘चेक इन बॅगेज’मधील पॉवर बँक ‘केबिन बॅगेज’मध्ये ठेवण्यास सांगितले गेले असेल.त्यावेळी कदाचित तुम्हाला तसे करायला लावल्याबद्दल रागदेखील आला असेल. विमान प्रवासाच्या वेळेस ‘चेक-इन बॅगेज’मधून पॉवर बँक घेऊन जाण्यास मनाई आहे. प्रवासी म्हणून आपण नियमांचे पालन केलेच पाहिजे; परंतु या नियमामागील कारणाचा विचार केला आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या नियमामागे विमानाची सुरक्षा कारणीभूत आहे. पॉवर बँकमध्ये लिथियम सेल्सचा वापर केला जातो, जे पेट घेऊ शकतात. या आगीचे मोठ्या आगीत रूपांतर होऊ शकते. जर पॉवर बँकने कार्गोमध्ये पेट घेतला, तर ती आग क्रू मेंबर्सना समजणार नाही आणि त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. “सिव्हिल एव्हिएशन महासंचालनालयाने (DGCA) चेक केल्या जाणाऱ्या बॅगेजमधून पॉवर बँक घेऊन जाण्यास मनाई केली आहे. कारण- त्या बॅटरी आहेत, ज्या ज्वलनशील असतात. बॅटरी जास्त गरम होऊ शकतात आणि चुकीची हाताळणी किंवा त्या खराब झाल्यास आग लागू शकते. त्यामुळे त्यांना विशिष्ट मर्यादेत प्रवाशासोबत फक्त हॅण्ड बॅगेज किंवा कॅरी-ऑन बॅगेजमध्ये नेण्याची परवानगी आहे.

फ्लाइट क्रू जर पॉवर बँक प्रवाशाकडे असेल तर तिला आग लागल्याचे सहज लक्षात येईल. तसेच केबिनमधील अग्निशमन उपकरणांच्या मदतीने ती विझवता येईल. त्यामुळे या वस्तू फक्त कॅरी-ऑन लगेजमध्येच ठेवाव्यात, असे एव्हिएशन ट्रेनिंग इंडियाचे विमानतज्ज्ञ राजगोपाल यांनी स्पष्ट केले. एअरलाइन्स जास्तीत जास्त 100Wh पर्यंतच्या हॅण्ड बॅगेजसह पॉवर बँकांना परवानगी देतात; तर ज्यांची क्षमता 100Wh व 160Wh यादरम्यान असते, त्यांना पूर्वी एअरलाइनची परवानगी आवश्यक असे. प्रवाशांनी त्यांची पॉवर बँक त्यांच्या हॅण्ड बॅगेजमध्ये ठेवली पाहिजे.

पॉवर बँकेमुळे विमानांना कोणता धोका?

केबिन प्रेशर बदल : टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान केबिन प्रेशरमध्ये चढ-उतार होतात, ज्यामुळे लिथियम-आयन बॅटरीच्या स्थिरतेशी तडजोड होऊ शकते, असे वातावरण तयार होते. त्यामुळे पॉवर बँक जास्त गरम होऊ शकते किंवा पेटू शकते.

ओव्हरहीटिंग : पॉवर बँक वापरात असताना उष्णता निर्माण करतात. मर्यादित व्हेंटिलेशन असलेल्या दाबयुक्त केबिनमध्ये, या उष्णतावाढीमुळे थर्मल रनवेचा धोका वाढू शकतो, जिथे बॅटरीमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेमुळे त्याला आग लागते.

शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी नेहमी संबंधित विमान कंपनीच्या नियमांची तपासणी करणे आवश्यक आहे. आता तुम्हाला पावर बँक्स चेक-इन बॅगेजऐवजी केबिन बॅगेजमध्ये ठेवायला का सांगतात याचं उत्तर मिळाले असेल. पुढील वेळी विमान प्रवासाला जाताना ही काळजी घेतल्यास तुमचा वेळ वाचू शकतो.