खरंतर उंदाराला गणपतीचं वाहन मानलं जातं. पण, तरीही घरात उंदीर असलेलं कुणालाही आवडत नाही. कारण, उंदीर घाणीत फिरत असतात. घरातही उंदीर सगळीकडे घाण करत असतात. त्याचपद्धतीनं उंदीर कुठलीही वस्तू कुरतडतात. मग, घरात ठेवलेली २००० हजार रूपयांची नोटही का असेना. यासह महागड्या वस्तुही उंदीर कुरतडतात.
उंदीर वस्तू कुरतडून नुकसान करतात, पण खात नाहीत. ते असं का करतात? हा प्रश्न सर्वांना पडला असेल. तर, आपण याबद्दल जाणून घेणार आहोत…
हेही वाचा : निवडणुकीत बोटावर लावण्यात येणारी शाई कुठं तयार होते? काय आहे तिचा इतिहास? जाणून घ्या…
माणसाच्या आणि उंदराच्या दातांमध्ये जमीन-आसमानचा फरक आहे. माणसाचे दात एका ठराविक वेळेनंतर वाढायचे बंद होतात. मात्र, उंदाराचे दात वाढण्याची प्रक्रिया माणसापेक्षा वेगळी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण उंदराचे दातांची वाढ सतत होत असते. त्यामुळे दातांची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी उंदीर वेग-वेगळ्या वस्तू कुरतडत असतात.
उंदराने वस्तू कुरतडल्या नाहीत, तर त्यांच्या दातांचा आकार वाढत जाईल. मग, उंदराला तोंडही बंद करता येणार नाही.
हेही वाचा : पोपट हुबेहूब मानवी आवाज कसा काढतात? त्यांच्या गळ्यात कोणती अशी विशेष गोष्ट असते? जाणून घ्या….
उंदराचे दात एवढे मजबूत असतात की, ते सिमेंटची भिंत आणि जमिनीतही छेद करू शकतात. पेपर, कपडे आणि लाकडाच्या वस्तू कुरतडणे उंदरासाठी खूप अवघड गोष्ट नाही. सतत कुरतडत राहिल्याने उंदराच्या दातांची झिज होत राहते. याने उंदराच्या दातांची वाढ होत नाही.