Why Shrimp Hearts Are in Their Heads: फिश डिश मधली कोळंबी डिश ही सगळ्यांची आवडती डिश आहे. कोळंबी हा मासा छोटासा पण भन्नाट टेस्टी लागतो. कोळंबी हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कोळंबी हा मासा आपल्याकडे खूप चवीने खाल्ला जातो. कोळंबीला खवय्यांची मोठी मागणी असते. मात्र याच कोळंबीची एक मजेदार बाजू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला माहितीये का कोळंबीचे हृदय तिच्या डोक्यात असते ? विश्वास बसत नाही ना किंवा यापूर्वी कधी ऐकलं नाही ना..मात्र हे खरं आहे. कोळंबीचे हृदय हे तिच्या डोक्यात असते. मात्र कोळंबीच्या अशा प्रकारच्या शरीर रचनेचे नेमके कारण काय आहे, चला जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोळंबीचे हृदय तिच्या डोक्यात का असते?

अर्थातच याचे कारण जीवशास्त्रात येते. तेलंगणा टुडेच्या मते, कोळंबीचे हृदय हे तिचे पोट तसेच इतर महत्वाच्या अवयवांसह तिच्या डोक्याच्या आत असते. तुम्ही कोळंबी साफ करताना कधी जवळून पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की कोळंबीच्या डोक्याच्या, तोंडाच्या बाजूचा आकार जाड आणि कठीण भाग आहे. हा भाग अनेक पापुद्र्यांनी संरक्षण केलेला, झाकलेला असतो. ज्याला एक्सोस्केलेटन म्हणून ओळखले जाते. हे एक्सोस्केलेटन कोळंबीच्या अंतर्गत अवयवांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. यामुळेच कोळंबीचे महत्त्वाचे अवयव डोक्यात असतात. त्यामध्ये हृदयाचाही समावेश आहे. डोक्याचा भाग हा सुरक्षित असल्याने कोळंबीचे हृदय हे तिच्या डोक्यात असते.

हेही वाचा – तुमच्या आवडत्या बिस्किटाला ‘पार्ले जी’ नाव कुठून आले? बिस्किटावर असलेली छोटी मुलगी म्हणजे सुधा मूर्ती? जाणून घ्या 

एवढंच नाही तर कोळंबीच्या हृदयाच्या तीन जोड्या आहेत. जिथे रक्त आत आणि बाहेर येते, संपूर्ण शरीरात फिरते. पाण्याखाली ऑक्सिजनयुक्त राहण्यासाठी तशी रचना कोळंबीच्या शरीरात असते. यातून असं लक्षात येतं की एवढीशी लहान कोळंबी मात्र तिच्या शरिराची रचना किती गुंतागुंतीची आहे.

कोळंबीच्या रक्ताचा रंग

कोळंबी हा शब्द लॅटिन आणि ग्रीक भाषेतून आला आहे आणि त्याचा मूळ अर्थ समुद्री खेकडा असा होतो. कोळंबीचा आकार लहान असतो आणि त्यांची लांबी साधारणतः ३ सेंटीमीटर असते, त्यापेक्षा जास्त नसते. कोळंबीमध्ये असलेले काही अवयव पुढीलप्रमाणे, रंध्र, गोनाड, हृदय, हेपॅटोपॅनक्रियास (पचन ग्रंथी, राखीव पदार्थांच्या साठवणीसाठी काम करतात), पोट, गुद्द्वार आणि तोंड. आणखी एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल ती म्हणजे कोळंबीच्या रक्ताचा रंग निळा असतो. जे एक श्वसन रंगद्रव्य आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why shrimp hearts are in their heads did you know the heart of a shrimp is in their head interesting facts fish news trending today srk