Indian Wedding Rituals: भारतीय लग्न सोहळ्याचं आकर्षण अगदी जगातील प्रत्येक देशात पाहायला मिळतं. अनेक परदेशी पाहुणे भारतीय लग्नांमध्ये पाहुणे म्हणून येण्यासाठी व हा अनुभव घेण्यासाठी पैसे सुद्धा खर्च करायला तयार असतात. भारतीय लग्नांमध्ये प्रत्येक प्रांत, राज्य, भाषा व आवडीनुसार लग्नाच्या विधी परंपरा बदलत असतात पण या सगळ्याला बांधून ठेवणारा सोहळा मात्र नेहमीच भव्य दिव्य व राजेशाही असतो. गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येकजण लग्न थाटामाटात करण्यासाठी शक्य तेवढं सगळं काही करायला तयार असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशाच बिग फॅट इंडियन वेडिंग मधील एक खास रीत म्हणजे नवरदेवाचे बूट/चप्पल गमतीत लपवणे. नवरीकडच्या करवल्या किंवा नवरीच्या मैत्रिणी/ बहिणी लग्नात नवरदेवाची पादत्राणे लपवतात आणि मग पुन्हा देण्यासाठी गिफ्ट किंवा ठराविक रक्कम नवरदेवाला द्यावी लागते. सिनेमांमुळे आता ही पद्धत अगदी प्रत्येक मराठमोळ्या लग्नांमध्ये सुद्धा फॉलो केली जाते. पण खरोखरच ही परंपरा आहे का? असेल तर त्याचा अर्थ व महत्त्व काय? याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत.

नवरदेवाची बूट चोरणे किंबहुना लपवणे ही एक अनौपचारिक परंपरा आहे. खरंतर लग्न लागल्यानंतर नवरी, तिचे आई- वडील, भाऊ- बहीण हे सर्वच तिच्या पाठ्वणीच्या क्षणाची चाहूल लागल्याने काहीसे दुःखी झालेले असतात. अशावेळी त्यांचा मूड हलका व्हावा या उद्देशाने ही पद्धत सुरु झाली. यात नवरीकडच्या मंडळींना बूट लपवण्यासाठी आणि नवऱ्याकडच्या मंडळींना बुटांचे रक्षण करण्यासाठी लक्ष ठेवून राहावे लागते ज्यामुळे पाठ्वणीच्या त्या हळव्या क्षणापासून थोडं लक्ष विचलित व्हायला मदत होते. जर दोघांपैकी एकाही गटाला यश आलं तर मग दुसऱ्या गटाबरोबर त्यांची गोड भांडणं, मस्करी ही लग्नातील ऊर्जा वाढवण्याची पद्धत आहे.

हे ही वाचा<< गूगलच्या कर्मचाऱ्यांच्या पदानुसार पगाराचा आकडा वाचून डोकंच धराल! खालील तक्त्यातून जाणून घ्या

दुसरं महत्त्वाचं कारण व प्रश्न म्हणजे नवरदेव लग्नात इतक्या महाग वस्तू परिधान करतो, शिवाय फोन, दागिने इतके पर्याय असतात मग बूटच चोरण्याची/ लपवण्याची पद्धत का सुरु झाली असावी? तर याचं कारण म्हणजे पूर्वीच्या काळी शाही पादत्राणे ही नवऱ्याची शान मानली जात होती. जर पायातील बूट सांभाळता येत नसतील तर असा व्यक्त बेजाबदार मानला जात होता म्हणून बूट पादत्राणे लपवण्याची पद्धत सुरु झाली. शिवाय बूट लपवणे हा तसा सोपा पर्याय होता कारण फोन, दागिने या वस्तू नवरदेव आपल्या जवळच ठेवतो किंवा परिधान करतो पण लग्नातील विधींच्या वेळी त्याला चप्पला काढून ठेवणे भाग असते मग अशावेळी दुर्लक्ष झाल्याने नवरीकडील मंडळींना चप्पल लपवणे सोपे पडू शकते.

वरील दोन मुख्य कारणांमुळे लग्नात ‘जुते चुराई’ म्हणजेच नवऱ्याचे बूट किंवा चप्पला लपवणे ही पद्धत रूढ झाली. याला काही शास्त्रीय किंवा धार्मिक कारण नसून भावनिक पैलू जोडलेला आहे.