Indian cricket Team : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंकडे सर्वांचे बारीक लक्ष असते; पण तुम्ही कधी त्यांच्या जर्सीवर तीन स्टार पाहिले आहेत का? हो, तीन स्टार. हे स्टार बीसीसीआयच्या लोगोच्या थोड्या वरती असतात; पण तुम्ही कधी असा विचार केला का, हे स्टार कसले आहेत? हे जर्सीवर का आहेत? आणि फक्त तीनच स्टार का? आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. या स्टारमागील रोमांचक कहाणी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील तीन स्टार

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू निळ्या रंगाची जर्सी घालून क्रिकेट खेळतात. अनेकांना तर त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूच्या जर्सीचा नंबरही लक्षात असेल; पण तुम्ही कधी नीट पाहिले, तर तुम्हाला त्यांच्या जर्सीवर तीन स्टार दिसतील. हे तीन स्टार नेमके कसले?

हे स्टार भारताने केलेल्या तीन मोठ्या कामगिऱ्या दर्शवतात. हे तीन स्टार आपण जिंकलेले तीन विश्वचषक दाखवतात. भारताने आजवर १८८३, २०११ व २००७ चा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. १९८३ ला विश्वचषक कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली; तर २०११ चा विश्वचषक व २००७ चा टी-२० विश्वचषक एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली आपण जिंकला आहे. त्यामुळे या विजयाचे प्रतीक म्हणून भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर तीन स्टार दिसून येतात.

हेही वाचा : Congress Grass : शेतात सर्वत्र आढळणाऱ्या काँग्रेस गवताचा ‘काँग्रेस’ पक्षाशी संबंध काय?

यंदा विश्वचषकादरम्यान तुम्हाला क्रिकेटपटूंच्या जर्सीवर फक्त दोन स्टार दिसले असतील. तुम्हाला वाटेल की आता हे दोन स्टार कसले आहेत? तर हे दोन स्टार आपण जिंकलेले वनडेचे दोन विश्वचषक दर्शवतात. या वर्षी विश्वचषकादरम्यान तुम्ही क्रिकेटपटूंची जर्सी बघितली असेल, तर त्यावर फक्त दोन स्टार होते. यंदा भारत विश्वचषक जिंकू शकला नाही. त्यामुळे आपण जर्सीवर आणखी एक स्टार आणू शकलो नाही.

भारतीय क्रिकेट संघाची जर्सी अनेकदा बदलली आहे. काळानुसार त्या जर्सीचे स्वरूप बदलत गेले. आजही क्रिकेटपटूंचे अनेक चाहते मोठ्या संख्येने भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर येतात. कोणतीही लहान-मोठी मॅच असो हे क्रिकेटप्रेमी आवडीने ती जर्सी विकत घेतात आणि घालतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why the indian cricket team cricketers jersey have three stars do you know importance of three stars on indian cricket team jersey ndj