Why the Number of Cockroach Spike in Summer : किचनमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला इथून तिथून झुरळं फिरताना दिसतात का? किचन सतत स्वच्छ केल्यानंतरही या झुरळांचा त्रास कमी होत नाही. विविध औषधोपचार करून झाल्यानंतरही हे झुरळ सतत तुमच्या किचनमध्ये कब्जा करून बसतात. परिणामी किचनमधील अन्नसुरक्षेला धोका निर्माण होतो. त्यातच उन्हाळी काळात या झुरळांचा त्रास अधिक वाढतो. अशा परिस्थितीत आपलं घर किटकमुक्त कसं ठेवायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो. याबाबत इंडियन एक्स्प्रेसने काही तज्ज्ञांशी बोलून उपाय शोधून काढले आहेत.

इंडियन पेस्ट कंट्रोल कंपनीचे दीपक शर्मा यांनी सांगितले की हवामान बदलाबरोबर कीटकांचं वर्तन बदलत असतं. उदाहरणार्थ, पावसाळ्यात उंदीर अधिक दिसतात. तसंच, झुरळे सीवर लाईन्स किंवा गटारांमध्ये राहतात जिथे हवामान उष्ण आणि दमट असतं. म्हणूनच उन्हाळाच्या काळात झुरळ घरात अधिक दिसतात”, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की ते, उन्हाळ्यात अन्न उपलब्ध होत असल्याने त्यांच्या हालचाली वाढतात. तसंच हे प्राणी थंड रक्ताचे असतात. या काळात त्यांची प्रजनन क्षमता वाढलेली असल्याने त्यांच्या संख्येतही वाढ होते. परिणामी आपण संकटात येतो”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

घरातील झुरळ रोखण्यासाठी काय कराल? (What can you do to prevent Cockroaches?)

काळोख, ओलसर आणि दमट जागांमध्ये झुरळ सर्वाधिक आढळतात. त्यामुळे याबाबत दीपक शर्मा म्हणाले, “सिलिंडरखाली, सिंकखाली आणि फ्रिजमागे असलेल्या जागा सतत स्वच्छ ठेवा. या जागांकडे आपलं फार कमी लक्ष असतं.

झुरळांची प्रतिकारशक्ती चांगली असते. त्यांना पोषक असलेल्या जागा कमी करून तिथे स्वच्छता ठेवणे हा एकमेव घरगुती उपाय आहे. म्हणजेच सिलिंडरखाली, सिंकखाली आणि फ्रिजच्या मागे स्वच्छता ठेवणे. खड्डे भरून काढले, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्याशी सहमती दर्शवत, सेलिब्रिटी शेफ अनन्या बॅनर्जी यांनी झुरळांना दूर ठेवण्यासाठी काही नैसर्गिक DIY हॅक्स शेअर केले, जसे की तुमच्या स्वयंपाकघरात वाळलेली तमालपत्रे ठेवणे. कारण त्यांचा तीव्र वास झुरळांना दूर ठेवतो. लवंग, दालचिनी आणि कडुलिंबाची पाने देखील झुरळ घालवण्याचं काम करतात. तुम्ही पाण्यात कडुलिंबाच्या तेलाचे दोन थेंब मिसळून खोलीत स्प्रे करू शकता. झुरळे मारण्यासाठी स्वयंपाकघरातील काउंटरटॉप्स आणि कोपऱ्यांवर बोरिक अॅसिड आणि साखरेचे मिश्रण टाका”, असंही त्या म्हणाल्या.