Why There Is No X Symbol On Vande Bharat Train : प्रत्येक एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्ब्यावर X चिन्ह लावलेलं असतं. या चिन्हाला सुरक्षेच्या कारणास्तव बनवण्यात येतं. हे चिन्ह दर्शवतं की, हा ट्रेनचा शेवटचा कोच आहे. परंतु, वंदे भारत ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर X चिन्ह नसतं. पण या ट्रेनला हे चिन्ह का वापरण्यात आलं नाही. असा प्रश्न अनेकांना पडलाच असेल. परंतु, वंदे भारत ट्रेनला हे चिन्ह न लावण्यामागे एक खास कारण आहे. ते तुम्हाला समजल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात यामागे नेमकं कारण काय आहे.

हे चिन्ह महत्वाचं का आहे?

जेव्हा एखादी ट्रेन स्टेशनवरून जात असते, रेल्वे कर्माचारी शेवटच्या डब्ब्यावर लिहिलेलं X चिन्ह पाहतात. ते चिन्ह पाहिल्यानंतर त्यांना खात्री होते की, हा शेवटचा डब्बा आहे. जर X चिन्ह नसेल, तर याचा अर्थ असा होतो की, त्या ट्रेनच्या मागच्या दिशेला लावण्यात आलेले डब्बे ट्रेनपासून वेगळे झाले असून कुठंतरी मागे राहिले आहेत. यानंतर कर्मचारी तातडीने कंट्रोल रुमला संपर्क करतात आणि ट्र्रेनचे शेवटचे डब्बे वेगळे झाले असल्याची माहिती देतात. यामुळेच कोणत्याही ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यात X चिन्ह लावणं खूप महत्वाचं असतं. नाहीतर हे धोकादायक ठरू शकतं.

train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”

नक्की वाचा – जिवंत बिबट्याला दुचाकीला बांधलं अन् थेट रुग्णालय गाठलं, झटापटीत घडलं… थरारक व्हिडीओ व्हायरल

वंदे भारत ट्रेनला X चिन्ह का लावलं नाही?

वंदे भारत ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर हे चिन्ह लावलेलं नाही. कारण वंदे भारत ट्रेन एक हाय स्पीड ट्रेन आहे आणि पूर्णपणे अटॅच्ड आहे. ही ट्रेन दोन्ही बाजूंनी चालते. म्हणून या ट्रेनला X चिन्ह देण्यात आलं नाही.

वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ऑटोमॅटिक स्लायडिंग दरवाजा असतो. प्रत्येक दरवाजाच्या बाहेर ऑटोमॅटिक फुटरेस्ट असते. यामुळे प्रवाशांना सुविधा मिळते. कारण हा दरवाजा स्टेशनवर ऑटोमॅटिक उघडतो. वंदे भारत ट्रेनमध्ये सीट्स रिक्लाईन करण्याची सुविधा असते. तसंच प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉईंट असतं.