आपण अनेकदा रेल्वेने प्रवास करतो. या प्रवासादरम्यान आपल्याला रेल्वेशी निगडित असंख्य प्रश्न पडतात. देशभर पसरलेले हे रेल्वेचे जाळे काम कसे करते? यावर नियंत्रण कसे ठेवले जाते? इतक्या मोठ्या यंत्रणेमध्ये बिघाड होऊ नये असे असंख्य प्रश्न तुम्हालाही पडली असतीलच. असाच एक रेल्वेने प्रवास करताना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा उपयोग काय?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणारी पिवळी पट्टी तुम्ही पाहिली असेल. ही पट्टी रेल्वे रुळापासून थोड्याच अंतरावर असते. पट्टी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्मवर ही पिवळी पट्टी लावण्यात येते. कधी पिवळ्या रंगाने ही पट्टी काढली जाते तर कधी पिवळ्या रंगाचे टाईल्स प्लॅटफॉर्मवर बसवण्यात येतात. याचा उपयोग प्रवाशांनी ट्रेनपासून सुरक्षित अंतरावर उभे राहावे हे सांगण्यासाठी होतो.

आणखी वाचा: रेल्वेरुळाशेजारी का असतात असे बॉक्स? जाणून घ्या याचे महत्त्व

अनेकवेळा ट्रेनमध्ये लवकर चढण्यासाठी प्रवासी प्लॅटफॉर्मच्या जिथे संपतो तिथे म्हणजेच ट्रेनच्या अगदी जवळ उभे राहतात. पण वेगाने येणाऱ्या ट्रेनमुळे अशा प्रवाशांचा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिवळी पट्टी ट्रेनपासून सुरक्षित अंतर राखा, असे सूचित करते. अपघात टाळण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने या पिवळ्या पट्टीच्या आत उभे राहणे गरजेचे आहे.

आणखी वाचा: ट्रेनवर असणाऱ्या या झाकणांचा उपयोग काय असतो? जाणून घ्या याचे महत्त्व

या पिवळ्या पट्टीचा आणखी एक उपयोग आहे, तो म्हणजे ज्या व्यक्तींची दृष्टी कमकुवत असते त्या व्यक्तींना या पट्टीमुळे मदत मिळते. त्यांना रुळ किती अंतरावर आहेत हे समजते आणि अपघात टाळण्यास मदत होते. अशाप्रकारे रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीमागे ही महत्त्वाची कारणं असतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why there is yellow line on every railway platform know the reason and significance of it pns