Why toilet flush has one large and one small button: आजकाल घरांपासून ते मोठमोठे शॉपिंग मॉल्स, कॉर्पोरेट कार्यालये, हॉटेल्स, पब आणि रेस्टॉरंट्सपर्यंतच्या वॉशरूममध्ये नवीन शैलीतील आधुनिक फिटिंग्ज दाखल झाल्या आहेत. तुम्ही त्या ठिकानक अनेक प्रकारचे टॉयलेट फ्लश पाहिले असतील आणि त्यांचा वापरही केला असेल. आजही भारतात बहुतेक ठिकाणी तुम्हाला असे फ्लश टँक सापडतील ज्यात एक मोठे आणि एक लहान बटण आहे, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का असते?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाणी वाचवण्याची टेक्निक

मॉर्डन टॉयलेटमध्ये दोन प्रकारचे बटणे असतात आणि दोन्ही बटणे एक्झिट व्हॉल्व्हशी जोडलेली असतात. मोठे बटण दाबून सुमारे ६ लिटर पाणी सोडले जाते, तर लहान बटण दाबून ३ ते ४.५ लिटर पाणी सोडले जाते. आता जाणून घेऊया अशा प्रकारे किती पाण्याची बचत होते?

एका वर्षात पाण्याची इतकी बचत होते

मीडिया रिपोर्ट्सनुसार, घरामध्ये सिंगल फ्लशऐवजी ड्युअल फ्लशिंगचा अवलंब केल्यास वर्षभरात सुमारे २० हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते. जरी याचे इंस्टॉलेशन सामान्य फ्लशपेक्षा जास्त महाग आहे, परंतु यामुळे, आपल्या पाण्याच्या बिलात बऱ्यापैकी बचत होते.

यंत्रणा कशी काम करते?

ही सिस्टीम कशी काम करते हे या व्हिडिओतून जाणून घ्या..

( हे ही वाचा: मॉल मधील टॉयलेटचा दरवाजा खालून उघडा का असतो? यामागील कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल)

दोन टॉयलेट फ्लशच्या लॉजिक बद्दल जाणून तुम्हीही थक्क झाला असाल ना? तर हीच माहिती तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि मित्र मंडळीसोबत देखील शेअर करा..

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why toilet flush has one large and one small button do you know the reason behind it gps