आपल्याला दैनंदिन आयुष्यात वापरात असणाऱ्या अनेक गोष्टींबाबत माहिती नसते. काही गोष्टींचा वापर विशिष्ट प्रकारेच का केला जातो, काही गोष्टी विशिष्ट रंगाच्याच का असतात असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण त्याची योग्य उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. असाच एक सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे गाड्यांचे टायर काळ्या रंगांचेच का असतात? यामागे काय कारण असते जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टायरचा रंग काळा का असतो?

टायरचे रंग काळे असण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. टायर बनवण्यासाठी वापरण्यात येणारा रब्बर पिवळ्या रंगाचा असतो. हे टायर बनवण्यासाठी जसेच्या तसे वापरल्यास ते पटकन झिजते. त्यामुळे त्यात कार्बन मिसळले जाते. कार्बन मिसळल्याने टायर मजबूत होते. यामुळेच त्याचा रंग काळा होतो. कार्बन व्यतिरिक्त टायर मजबुत करण्यासाठी सल्फरचाही वापर केला जातो.

आणखी वाचा: ‘यात्रीगण कृपया ध्यान दे…’ रेल्वे स्थानकांवर ऐकू येणाऱ्या आवाजामागील चेहरा; जाणून घ्या कशी झाली निवड

तुम्ही लहान मुलांच्या सायकलमध्ये वेगवेगळ्या रंगाचे टायर पाहिले असतील. पण हे टायर जास्त दिवस टिकत नाहीत त्यांची लगेच झिज होते. खुप वर्षांपुर्वी टायर पांढऱ्या रंगाचेही बनवले जात असत, पण ते काळ्या टायरपेक्षा कमी टिकाऊ होते. त्यामुळे सर्वत्र काळे टायरच वापरले जाऊ लागले.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why vehicle tires are black know the scientific reason behind it pns