अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, जे लोक दररोज सिगारेट ओढतात, त्यानंतर आजारी पडतात मग धूम्रपान सोडण्याविषयी बोलतात. तुम्ही असे लोकही पाहिले असतील, जे आधी खूप दारू पितात आणि मग हँगओव्हर झाला की, ते पुन्हा कधीच दारू पिणार नाही, असे म्हणतात. पण सगळं झाल्यानंतर पुन्हा सिगारेट, दारूचे व्यसन सुरुच ठेवतात. जुगार खेळणारे लोकही झुगारात मोठी रक्कम हरल्यानंतर पुन्हा कधीच खेळणार नाही अशी शपथ घेतात, परंतु ते पुन्हा खेळतात. यामुळे शास्त्रज्ञांनी एखादी व्यक्ती कशा प्रकारच्या चुका तोटे माहित असूनही पुन्हा-पुन्हा का करते याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
मानसशास्त्रज्ञांच्या एका टीमने लोक चुकीच्या गोष्टी पुन्हा का करतो याबाबत संशोधन केले आहे. प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स युनिव्हर्सिटी आणि वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीच्या संशोधन अहवालानुसार, वारंवार चुका करणाऱ्यांना स्वतःत बदल करण्याची इच्छा कमी नसते. पण ते त्यांच्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टींचे खरे कारण समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत. म्हणूनच ते एक चूक पुन्हा पुन्हा करतात. मानसशास्त्रज्ञांच्या टीमने या संशोधनासाठी एका खास व्हिडिओ गेमचा आधार घेतला आहे.
शास्त्रज्ञांनी काही तरुणांना खेळण्यासाठी एक व्हिडिओ गेम दिला, जो विश्वातील वेगवेगळ्या मायावी ग्रहांवर आधारित होता. संशोधनात सहभागी तरुणांना व्हिडिओ गेममध्ये दिलेल्या दोन ग्रहांवर क्लिक करायचे होते. त्या बदल्यात त्यांना काही मार्क्स मिळायचे. एवढेच नाही तर एकूण गुणांच्या आधारे पैसे मिळायचे. शास्त्रज्ञांनी तरुणांना सांगितले नाही की, जेव्हाही ते एखाद्या ग्रहावर क्लिक करतात तेव्हा काही नवीन अंतराळयान दिसतील. हे अंतराळयान त्यांचे मार्क्स चोरणारे होते. त्याच वेळी, पण दुसऱ्या ग्रहावर क्लिक केल्यावर येणारे स्पेसशिप त्यांच्या मार्क्सना इजा करणारे नव्हते.
शास्त्रज्ञांनी ‘सेन्सिटिव्ह’ हे नाव कोणाला दिले?
संशोधनादरम्यान व्हिडिओ गेममध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या तरुणांना वैज्ञानिकांनी ‘सेन्सिटिव्ह’ असे नाव दिले. कारण चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना पहिला ग्रह आणि दुसऱ्या ग्रहावर क्लिक करुन येणाऱ्या स्पेसशिप यांच्यातील संबंध समजला होता. ज्यातून त्यांचे गुण चोरले जात होते. हे संबंध समजल्यानंतर त्यांनी आपल्या वागण्यात बदल केला. यानंतर त्यांनी अंक चोरणाऱ्या ग्रहावर क्लिकही केले नाही. यामुळे त्याची कामगिरी चांगली झाली.
खराब कामगिरी करणाऱ्यांना काय नाव दिले गेले?
संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, काही तरुणांना वारंवार व्हिडिओ गेम खेळूनही स्पेसशिप आणि ग्रह यांच्यातील संबंध समजू शकला नाही. अशा परिस्थितीत वारंवार नुकसान सहन करूनही ते वाईट ग्रहावर क्लिक करत होते. यावर मानसशास्त्रज्ञांनी त्यांना दुष्ट ग्रह आणि मार्क्स चोरणाऱ्या स्पेसशिपमधील संबंध समजावून सांगितले. यानंतर त्यांनीही त्या ग्रहावर क्लिक केले नाही. त्याचवेळी काही तरुण असेही होते की, ज्यांना ग्रह आणि स्पेसशिपमधील संबंध सांगूनही वाईट ग्रहावर क्लिक करतच राहिले. अशा तरुणांना शास्त्रज्ञांनी ‘कम्पल्सिव्ह’ असे नाव दिले होते.
लोक प्रत्यक्षात अधिक लवचिक स्वभावाचे असतात
संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. फिलिप जीन रिचर्ड डी ब्रेसेल म्हणाले की, अनेकांना समजावून सांगूनही ते कसे वागतात हे त्यांना समजत नाही. यामुळे त्यांच्या कामगिरीत सुधारणा होत नाही. यावेळी संशोधनात असेही आढळून आले की, काही लोकांना त्यांच्या वर्तनाचा परिणाम योग्य वेळी समजावून सांगितला तर ते त्यांचे वर्तन बदलतात आणि त्यांची कार्यक्षमता सुधारतात. संशोधनात सहभागी असलेले वर्तणुकीशी संबंधित न्यूरोसायंटिस्ट प्रोफेसर गॅवन मॅकनॅली यांच्या मते, वास्तविक जीवनातील लोक यापेक्षा अधिक लवचिक असतात. आमचे संशोधन सांगते की, अशा परिस्थितीत मेंदूमध्ये काय चालले आहे?
व्यक्ती ‘या’ सवयी बदलू शकत नाहीत
संशोधनानुसार, दोन सवयी अशा आहेत ज्या व्यक्ती सर्व काही जाणून घेऊन आणि समजावूनही बदलत नाही. शास्त्रज्ञांच्या मते, व्यसन आणि जुगाराची वाईट सवय सोडण्यासाठी लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वास्तविक, दोन्ही सवयींनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती त्यांच्या कामाला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानतात. त्यामुळे नुकसान झाल्यानंतरही ते त्याचीच पुनरावृत्ती करत राहतात. त्याचवेळी त्यांची सवय त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे संशोधनात आढळून आले. तरीही ते चुकीचेच ते करत राहतात. असे लोक त्यांच्या वाईट सवयींमधून आणखी चुकीच्या गोष्टी शिकतात.