रस्त्यावरून किंवा महामार्गावरून प्रवास करताना आजूबाजूच्या झाडांच्या खोडांना पांढरा रंग दिल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण हा रंग देण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? नाही ना… त्यामुळे झाडांच्या खोडांना पांढऱ्या रंगाने रंगवण्याचे कारण काय आहे जाणून घेऊ…

मार्ग नीट दिसतो

खरंतर झाडांना पांढरा रंग देण्यामागचा मुख्य उद्देश रस्त्यावरून रात्रीने गाडीने प्रवास चालकाला सतर्क करणे. रात्रीच्या वेळी झाडांना दिलेला पांढरा रंग हा दूर लगेच दिसतो, त्यामुळे मार्ग दिसणे सोपे जाते. हायवेवरील झाडांना पांढरा रंग यासाठी दिला जातो जेणेकरून रात्रीच्या वेळी झाडे नजर यावीत.

Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
Chandrapur forest area loksatta news
माजी वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जंगल घटले
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
Mukesh Ambanis daughter Isha Ambani spotted with colour-changing luxury SUV it is worth Rs 4 core
मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीकडे आहे सरड्यासारखी रंग बदलणारी कार! किंमत ऐकून बसेल धक्का….
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?

किटकांपासून संरक्षण होते

झाडांना लावलेला पांढरा रंग म्हणजे चुना असतो. चुन्याने झाडांना रंग दिला जातो ज्यामुळे झाडावर किटक, किडे आणि बुरशीचा धोका कमी होतो. चुना झाडांच्या मुळाशी जाऊन झाडांवरील कीटकांचा नाश करतो, त्यामुळे झाडाची मुळे कमकुवत होत नाहीत. याशिवाय रंगामुळे खोडाच्या साली, भेगा आणि फटी भरल्या जातात त्यामुळे कीटकांना वाढीस जागा मिळत नाही.

सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल झाडांच्या खोडांना तडे जाऊ लागतात. त्यामुळे त्यांची साल ही खोडापासून वेगळी होऊ लागते. पण झाडांना पांढरा रंग दिल्याने सूर्यकिरणांचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही, त्यामुळे झाडं निरोगी राहते.

काही संरक्षित भागांमध्ये झाडांना लावलेला पांढरा रंग हे दर्शवतो की, ही झाडे वन विभागाच्या अखत्यारीत आहेत.

Story img Loader