Why Writing In Red Ink Is Prohibited : अंधश्रद्धा म्हणजे खोलवर रुजलेल्या तर्कहीन समजुती, ज्या काहीतरी चांगले किंवा वाईट घडवू शकतात. तुम्ही कुठेही गेलात तरी प्रत्येक संस्कृतीत अंधश्रद्धा असतीलच. भारतात सर्वांत सामान्य अंधश्रद्धांपैकी एक म्हणजे जर आपल्यासमोरून काळी मांजर रस्ता ओलांडून गेली तर त्यामुळे काहीतरी दुर्दैवाची घटना घडते. अमेरिकेत, शिडीखाली चालणे दुर्दैव मानले जाते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, काही देशांमध्ये लाल शाईने लिहिण्यास मनाई आहे?

दक्षिण कोरिया, पोर्तुगाल व जपान यांसारख्या देशांमध्ये लाल शाईने लिहिण्यास मनाई आहे. दक्षिण कोरियामध्ये असे मानले जाते की, जर कोणी लाल शाईने लिहिले, तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. पण, या अंधश्रद्धेमागील कारण काय? दक्षिण कोरियामध्ये लाल शाईला वाईट मानले जाते. म्हणूनच लाल रंगाचे पेन मुलांपासून दूर ठेवले जाते. अंधश्रद्धा अशी आहे की, जर कोणी लाल पेनाने एखाद्याचे नाव लिहिले, तर ती व्यक्ती मरेल. त्यामुळेच दक्षिण कोरियाचे लोक घरात लाल पेन ठेवत नाहीत. ही अंधश्रद्धा शतकानुशतके पाळली जात आहे. पण, खरंच लाल शाई वापरल्यानंतर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो का?

लाल शाईने लिहिल्याने स्वतःचा मृत्यू होत नाही. तर, पारंपरिक कोरियन संस्कृतीत मृतांची नावे लाल रंगाच्या शाईने लिहिली जातात. म्हणून लोक जिवंत व्यक्तींची नावे लिहिण्यासाठी या पेनचा वापर करीत नाहीत. जर कोणी लाल शाईने एखाद्या व्यक्तीचे नाव लिहिले, तर असे मानले जाते की, ते त्या व्यक्तीला मारू इच्छितात. पोर्तुगालमध्येही लाल शाईने लिहिणे असभ्य मानले जाते.

इतिहासात डोकावताना…

ऐतिहासिकदृष्ट्या दक्षिण कोरियामध्ये लाल रंग मृत्यूचे प्रतीक आहे. आणखी एक सिद्धान्त असा असू शकतो की, कोरियाच्या जोसेन राजवंशातील सातवे सम्राट, राजा सेजोंग द ग्रेट यांचे दुसरे पुत्र ग्रँड प्रिन्स सुयांग यांनी त्यांचा पुतण्या राजा डानजोंग यांच्याविरुद्ध उठाव करण्याचा कट रचला होता, असे दावे केले गेले आहेत की, ग्रँड प्रिन्स सुयांग यांनी त्यांच्या शत्रूंची हिट लिस्ट तयार करण्यासाठी लाल शाईचा वापर केला होता. आणखी एक सिद्धान्त असा आहे की, कोरियन युद्धादरम्यान मृत नागरिक किंवा शहीद सैनिकांची नावे काढून टाकण्यासाठी लाल शाईचा वापर केला जात असे. लाल रंग लवकरच मृत्यूसारख्या अशुभ घटनांशी जोडला जाऊ लागला म्हणूनच तेथे लोकांना लाल शाईने लिहिण्यास मनाई केली जात आहे.

Story img Loader