Do You Know : अनेकदा आपल्याबरोबर अशा काही गोष्टी घडतात ज्या आश्चर्यकारक असतात पण कारण माहित नसल्यामुळे आपण अनेक अशा गोष्टींना चमत्कार मानतो. पण प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असते. तुम्ही कधी नाक दाबून गाणी गुणगुणण्याचा प्रयत्न केला का? जर नाही तर करून बघा. कोणीही नाक दाबून गुणगुणू शकणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुम्ही तुमचे नाक हाताच्या चिमटीत पकडले आणि बोलण्याचा प्रयत्न केला किंवा गाणी म्हणण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुम्ही दबक्या आवाजात सहज बोलू शकाल किंवा गाणी म्हणू शकाल पण जेव्हा तुम्ही नाक हाताच्या बोटांनी पकडून गाणी गुणगुणण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही कदाचित अयशस्वी होऊ शकता. कोणालाही ते जमणार नाही. आता तुम्हाला वाटेल, असं का? तर त्यामागे एक कारण आहे. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

तुम्ही नाक दाबून का गुणगुणू शकत नाही?

आपल्यापैकी अनेक जणांनी नाक दाबून गुणगुण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुम्ही गुणगुणू शकले नाही. कारण नाक दाबून आपण गुणगुणू शकत नाही. आता तुम्हाला वाटेल या मागील नेमकं कारण काय? तर या मागे सर्वात सोपे कारण आहे. ते कारण जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक प्रयोग करावा लागेल.

हेही वाचा :Marathi Bhasha Din: पाकिस्तानातील ‘या’ शाळेला आहे मराठी माणसाचे नाव; वाचा, काय आहे कारण…

तुम्ही सुरुवातीला गुणगुणण्याचा प्रयत्न करा पण तुमचे नाक बंद करू नका. फक्त तुमची बोटे तुमच्या नाकपुड्यासमोर ठेवा. तुम्हाला कळेल की तुम्ही श्वास सोडत आहात आणि तुमच्या लगेच लक्षात येईल की गुणगुणण्यासाठी नाकातून श्वास सोडणे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही नाक दाबून ठेवता तेव्हा तुम्ही गुणगुणू शकत नाही.

लंडन सिंगिंग इन्स्टिट्युटने लोक आवाज कसा निर्माण करतात याबद्दल सांगितले. लंडन सिंगिंग इन्स्टिटयूटनुसार आवाज निर्मितीसाठी स्वरांमधून हवा जाणे आवश्यक आहे. जेव्हा नाक आणि तोंड दोन्ही बंद असेल तर श्वास घेता येत नाही आणि सोडता पण येत नाही त्यामुळे आपण गुणगुणू शकत नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why you can not to hum while holding your nose know the reason ndj