तुम्हाला एखाद्या व्यक्तीने स्पर्श केल्यानंतर तुम्हाला करंट लागतो का? असा अनुभव तुम्हाला अनेकदा आला असेल. म्हणजेच, जेव्हा कोणी तुम्हाला स्पर्श करते, तेव्हा क्षणभर तुम्हाला विजेचा झटका किंवा त्वचेवर सुई टोचल्याचा अनुभव येतो. कधीकधी दरवाजाच्या नॉबला, खुर्चीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श केल्याने आपल्याला विजेचा हलका धक्का लागू शकतो. तुम्ही कधी यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला स्पर्श केला तरी आपल्याला विजेचा झटका का येतो हे माहित आहे का? जर नसेल तर या लेखात आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत.

खरं तर एखाद्या व्यक्तीने स्पर्श केल्यानंतर करंट लागणे हे सहसा केव्हाही घडू शकते पण काही लोकांना विशेषतः हिवाळ्यात अशा परिस्थितीचा जास्त सामना करावा लागतो. तुमच्याबरोबरही असे कधी कधी घडले असेलच ना. अशा परिस्थितीत यामागचे कारण सविस्तरपणे समजून घेऊया…

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
pick up tempo fell in creek while being loaded into boat in Raigad
Video : रायगडमध्ये बोटीत चढवतांना पिकअप टेम्पो खाडीत पडला… घटना सीसीटीव्हीत कैद
Passengers inside metro over seat issues shocking video goes viral on social media
हद्दच झाली! मेट्रोमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक

हेही वाचा – तुम्ही नाक दाबून गुणगुणू शकत नाही; असं का? जाणून घ्या यामागील खरं कारण 

कारण काय आहे?

लहानपणी तुम्ही विज्ञानाच्या पुस्तकात वाचले असेल की, जगातील जवळपास सर्व वस्तू अणूंपासून बनलेल्या आहेत. अणू म्हणजे त्यात इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. ते उघड्या डोळ्यांनी पाहिले जाऊ शकत नाहीत. आपल्या शरीरात इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन देखील आढळतात.

इलेक्ट्रॉन्समध्ये ऋण (-ve)चार्ज असतो, प्रोटॉनमध्ये सकारात्मक (+ve) चार्ज असतो आणि न्यूट्रॉन तटस्थ असतात. तेव्हा शरीराच्या आत असलेल्या इलेक्ट्रॉनमध्ये खूप हालचाल होते. त्याच वेळी, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढते तेव्हा त्यावरील नकारात्मक चार्ज देखील वाढतो. ते इतर कोणत्याही वस्तू किंवा व्यक्तीमध्ये उपस्थित असलेले सकारात्मक इलेक्ट्रॉनला आकर्षित करतात.

जर आपण सोप्या भाषेत समजले तर, आपल्या शरीरातील इलेक्ट्रॉन्स जेव्हा असंतुलित होतात, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला स्पर्श करतो तेव्हा ते शरीरातून बाहेर पडू लागतात आणि वर सांगितल्याप्रमाणे, यावेळी या इलेक्ट्रॉन्सवर अधिक नकारात्मक चार्ज असतो, अशा परिस्थितीत, इलेक्ट्रॉन्स शरीराबाहेर जाऊ लागतात, जेव्हा आपण एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श करतो तेव्हा त्यातील इलेक्ट्रॉन्सला सकारात्मक चार्ज मिळतो. त्यामुळे करटं जाणवतो. म्हणजे इलेक्ट्रॉन एका शरीरातून दुसऱ्या शरीरात वेगाने जातात आणि त्यामुळे आपल्याला हलका धक्का जाणवतो.

हवामान देखील जबाबदार आहे का?

होय, हिवाळ्यात किंवा आपल्या सभोवतालचे हवामान कोरडे असताना इलेक्ट्रिक चार्ज सर्वात जास्त तयार होतात. हवा कोरडी होते आणि आपल्या त्वचेच्या पृष्ठभागावर इलेक्ट्रॉन सहज निर्माण होतात. उन्हाळ्यात, हवेतील आर्द्रता नकारात्मक चार्ज असलेले इलेक्ट्रॉनला नष्ट करते आणि आपल्याल क्वचितच विद्युत चार्ज जाणवतो.

हेही वाचा – Dry Ice खाल्याने ५ जणांना झाली रक्ताची उलटी; ड्राय आईस काय असतो? बर्फापेक्षा वेगळं काय असतं? 

हे नकारात्मक चार्ज केलेले इलेक्ट्रॉन कायमचे राहतात का?

इलेक्ट्रॉन्स आजूबाजूला चिकटत नाहीत, उलट मार्ग मिळताच ते निसटतात. उदाहरणार्थ, आपल्या शरीरात इलेक्ट्रॉन्सची संख्या खूप जास्त असल्यास, आपण सकारात्मक चार्ज असलेल्या केलेल्या वस्तूच्या संपर्कात येताच, इलेक्ट्रॉन आपल्याला शरारीतून बाहेर पडतात.

करंटमुळे किंचित वेदना होते. त्वचेमध्ये सुई टोचल्यासारखे वाटते.

इलेक्ट्रिक प्रवाहबद्दल काही मनोरंजक तथ्ये

  • आकाशात चमकणारी वीज हे स्थिर विजेचे एक मोठे रूप आहे, जे ढग आणि हवेतील घर्षणामुळे तयार होते!
  • आकाशात चमकणाऱ्या विजेशिवाय स्थिर वीज नेहमीच उच्च प्रवाह निर्माण करत नाही.
  • रेशीम किंवा काचेच्या रॉडला घासून निर्माण झालेल्या सकारात्मक चार्जपासून स्थिर वीज तयार केली जाऊ शकते.
  • नकारात्मक-चार्ज असेलल्या स्थिर प्रवाहासाठी, प्लास्टिक किंवा रबर रॉडवर फर घासून पाहू शकता.
  • स्थिर वीज देखील प्रकाशाच्या वेगाने प्रवास करते, जो १८६२८२ मैल प्रति सेकंद इतका आहे!