तुम्ही श्वान पाळत असाल तर तुम्हाला माहीत असेल की, जेव्हा श्वान वास घेण्यासाठी आपल्या जवळ येतो तेव्हा त्याचे नाक ओले असल्याचे जाणवते. पण, असे का होते याचा कोणी विचार केला आहे का? श्वानांच्या नाकांबद्दल जाणून घेण्यास पाळीव प्राणी प्रेमी फार पूर्वीपासून उत्सुक आहेत. श्वानांचे ओले नाक हे त्यांच्या चांगल्या आरोग्याचे आणि कल्याणाचे लक्षण मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना व्हेटिक पेट क्लिनिकमधील वरिष्ठ पशुवैद्यक डॉ. अभिषेक चौधरी यांनी श्वानांना ओले नाक का असते आणि त्यांच्या एकूण आरोग्यासाठी त्याचा काय अर्थ होतो हे स्पष्ट केले.

नैसर्गिक वास वाढवणारा (A natural smell enhancer)

श्वानांची वास घेण्याची क्षमता ही एक प्रसिद्ध गोष्ट आहे आणि त्यांचे ओले नाक ही क्षमता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. श्वानांच्या नाकातील विशेष ग्रंथी श्लेष्मा निर्माण करतात, जे त्यांच्या सभोवतालच्या सुगंधांना अडकवून ठेतात आणि त्यांना वास अधिक प्रभावीपणे प्रक्रिया करण्यास अनुमती देतात. डॉ. चौधरी स्पष्ट करतात, “ओलावा केवळ सुगंधाचे कणच अडकवत नाही तर अनुनासिक मार्ग (nasal passages) कोरडे होण्यापासूनदेखील रोखतो.” श्वान त्यांचे नाक ओले ठेवण्यासाठी वारंवार चाटतात, ज्यामुळे त्यांची नाकाची वास घेण्याची क्षमता आणखी वाढते.

कुत्र्यांचे नाक ओले का असते आणि या गुणाचा त्यांच्या आरोग्याला कसा फायदा होतो ते शोधा (सौजन्य – फ्रिपीक)

अंगभूत शीतकरण प्रणाली (A built-in cooling mechanism)

मानवांप्रमाणे श्वान त्यांच्या त्वचेतून घाम बाहेर काढत नाहीत. त्याऐवजी ते पर्यायी थंड करण्याच्या पद्धतींवर अवलंबून असतात, त्यापैकी एक म्हणजे त्यांचे नाक. श्वानांच्या नाकावरील ओलावा शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. डॉ. चौधरी यांच्या मते, “ओले नाक आर्द्र किंवा थंड वातावरणात विशेषतः प्रभावी असते, ज्यामुळे श्वानांना आरामदायी राहण्यास मदत होते.”

कुत्र्यांचे नाक ओले का असते आणि या गुणाचा त्यांच्या आरोग्याला कसा फायदा होतो ते शोधा
(सौजन्य – फ्रिपीक)

कुत्र्याचे नाक खूप ओले किंवा खूप कोरडे असेल तर काय? (What if a dog’s nose is too wet or too dry?)

ओले नाक हे सामान्यतः चांगल्या आरोग्याचे लक्षण असले तरी सामान्य ओलावा आणि असामान्य लक्षणे यांच्यात फरक करणे आवश्यक आहे. सतत वाहणारे नाक हे ॲलर्जी किंवा कॅनाइन इन्फेक्शियस रेस्पिरेटरी डिसीज कॉम्प्लेक्स (CIRDC) सारख्या अंतर्निहित आरोग्य समस्या दर्शवू शकते. “जर तुमच्या पाळीव प्राण्याचे नाक सतत वाहत असेल तर पशुवैद्यकाचा सल्ला घेणे योग्य आहे,” असे डॉ. चौधरी सांगतात.

याउलट, कोरडे किंवा फुटलेले नाक डिहायड्रेशन, ताप किंवा इतर आरोग्यविषयक समस्या दर्शवू शकते. डॉ. चौधरी अधोरेखित करतात की, “कोरडे नाक नेहमीच चिंताजनक नसते, परंतु त्याचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे, विशेषतः जर इतर लक्षणे असतील तर.” अशा प्रकरणांमध्ये पशुवैद्यकाकडे जाण्याची शिफारस केली जाते.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला तुमच्या श्वानाचे ओले नाक दिसेल, तेव्हा तो निसर्गाचा एक चमत्कार आहे असे समजा; जे त्यांची अविश्वसनीय वासाची भावना वाढवते आणि त्यांना थंड राहण्यास मदत करते. पण, अस्वस्थता किंवा आजार दर्शवू शकणाऱ्या लक्षणांवर लक्ष ठेवा. शेवटी तुमच्या पाळीव प्राण्याचे आरोग्य राखणे हे निरीक्षण करण्याइतकेच काळजी घेण्यासारखे आहे.