Know About Compensation Of Accident : दुचाकी चालवणाऱ्यांना हेल्मेट घालण्याच्या सूचना नेहमीच दिल्या जातात. परंतु, काही लोक नियमांचे उल्लंघन करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. इकोनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, वर्ष २०१८ मध्ये ४३,६०० लोकांचा अपघातात मृत्यू झाला. हेल्मेट न घातल्याने वाहनचालकांना प्राण गमवावे लागले, हेच यामागचं कारण आहे. तसंच २०१७ मध्ये ३५,९७५ जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

ट्रिब्यूनलने दिलेल्या माहितीनुसार, एका रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या ३८ वर्षीय व्यक्तीची पत्नी, मुलं आणि आईला देण्यात येणाऱ्या नुकसान भरुपाईबाबत निर्णय देताना म्हटलं गेलं की, अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीने हेल्मेट घातलं नव्हतं आणि मोटर वेहिकल अॅक्टच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. त्यामुळे या कुंटुबाला देण्यात येणाऱ्या भरपाईच्या रक्कमेतून ३० टक्के पैसे कट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणात पीडित कुटुंबाला १.०२ कोटी रुपयांची भरपाई मिळणार होती. परंतु, न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ३० टक्के रक्कम कमी करुन जै पैसे बाकी उरतील, ते त्या कुटुंबियांना देण्यात येतील.

नक्की वाचा – सावधान! मोबाईल कव्हरच्या पाठीमागे ५०, १००, किंवा ५०० रुपयांची नोट ठेवता का? जाणून घ्या याचे परिणाम

…तर त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकले असते

जेव्हा या प्रकरणावर सुनावणी होत होती. तेव्हा ट्रिब्यूनलला अशी माहिती मिळाली की, ट्रक ड्रायव्हरच्या चुकीमुळे अपघात झाला होता. तसंच अपघात झाला त्यावेळी चालकाने हेल्मेट घातला नव्हता. तसंच साक्षीदारांनाही पीडित व्यक्तीच्या बाजूला हेल्मेट दिसला नाही. त्यामुळे वाहन चालकांना सूचना दिल्या जातात की, प्रवास करताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा. ज्यामुळे तुमचा जीव वाचू शकतो आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघनही होणार नाही.

Story img Loader