World Consumer Right Day 2023 : जगभरात दरवर्षी १४ मार्च हा दिवस हा ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागतिक स्तरावर जनजागृती करण्यासाठी आणि ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. ग्राहक हा बाजारपेठेतील सर्वात महत्वाचा घटक आहे. परंतु ग्राहकांना खरेदीसाठी उद्युक्त करण्यासाठी विक्रेत्यांकडून अनेक प्रयत्न केले जातात. वेगवेगळी आमिषे दाखवली जातात, यातून अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात. यामुळे जगभरातील बाजारापेठेतील अन्यायाविषयी ग्राहकांना जागरुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
यादिनानिमित्त जगभरातील लोक ग्राहकांच्या मूलभूत हक्कांचे समर्थन करतात, तसेच ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि आदर करण्याची मागणी करत बाजारातील अन्यायाचा निषेध करतात. यावर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन २०२३ ची थीम स्वच्छ ऊर्जा संक्रमणाद्वरे ग्राहकांचे संरक्षण या संकल्पनेवर आधारित आहे.
भारतातील ग्राहकांचे नेमके हक्क काय?
9 डिसेंबर 1986 रोजी भारतीय संसदेत ग्राहकांना सक्षम करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला. हा कायदा ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ग्राहक परिषद, मंच आणि अपील न्यायालये स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करतो. यादिनानिमित्त आपण भारतातील ग्राहकांच्या मूलभूत हक्कांबाबत जाणून घेणार आहोत.
१) ग्राहक शिक्षण अधिकार
ग्राहकांना अनेकदा कोणत्याही वस्तू किंवा गोष्ट खरेदी करताना काहीच महिती नसले, अशावेळी ग्राहकांचे हक्क जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सरकार विविध पातळ्यांवर शिबीर आणि कार्यशाळा घेतल्या जातात.
२) ऑनलाईन तक्रार निवारणासाठीचे अधिकार
ऑनलाईन ई -कॉमर्स वेबसाईट्सवरून आजकाल ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये व्यवहार वाढत आहेत. यामुळे राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकांवर ग्राहकांकडून ई-कॉमर्स वेबसाईटविरोधातील तक्रारी वाढताहेत. दरम्यान राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकावर ग्राहकांच्या तक्रार नोंदणी, परतावा, बदली आणि सेवेतील कमतरता यासांरख्या अडचणींचे निराकरण केले जाते. राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकाच्या माध्यमातून खटला दाखल करण्यापूर्वी आपल्या स्तरावर वाद, अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. यासाठी ग्राहकाला ‘१९१५’ वर कॉल करून किंवा मोबाइल अॅपद्वारे तक्रार नोंदवावी लागते. यासह ग्राहकांना ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची ई-दाखिल पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे.
३) माहितीचा हक्क
कोणत्याही वस्तू किंवा उत्पादनाची सर्व माहिती मिळवणे हा ग्राहकांचा प्राथमिक हक्क आहे. यात ग्राहकाला संबंधित उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, शुद्धता, किंमत इत्यादींची सर्व माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक ग्राहकांकडून हा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. यात ग्राहकांना सोने खरेदीपूर्वी देखील त्याची शुद्धता तपासण्याचा अधिकार आहे.
४) सुरक्षितचेचा हक्क
ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेती हमी उत्पादकांनी देणे अनिवार्य असते. यात वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याच्या गुणवत्तेबाबत वस्तूंवर मिळणाऱ्या सेवेबाबत विचारणा करण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. यात ग्राहकांनीही आयएसआय आणि अॅगमार्कचं चिन्ह असलेल्या वस्तूचं विकत घ्याव्यात.
५) न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार
एखाद्या ग्राहकाला जर फसवणूक झाल्याचे किंवा होत असल्याचे वाटत असेल तर त्यासा त्यासंदर्भात तक्रार निवारण मंच आणि ग्राहक हक्क न्यायालयात दाद मागण्याचा हक्क आहे. अशापरिस्थितीत कोणताही ग्राहक थेट तक्रार दाखल करुन न्यायालयात खटला दाखल करु शकतो.
६) निवडीचा हक्क
एखादी वस्तू खरेदी करताना ग्राहकाला हवी असलेलीचं वस्तू निवडण्याचा अधिकार आहे. सध्या एका वस्तूसाठी ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे यातील ग्राहकाला आवडेल ती वस्तू खरेदी करण्याचे त्याला स्वातंत्र्य आहे. एखाद्या विक्रेत्याने जर ग्राहकावर विशिष्ट ब्रँडची वस्तूचं खरेदी करण्यास दबाव टाकला तर यातून ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन होईल,
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जॉन फिट्झगेराल्ड केनेडी यांच्या प्रेरणेतून सर्वप्रथम १५ मार्च १९८३ रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन पाळण्यात आला होता. जो यूएस काँग्रेसच्या भाषणातून प्रेरित होता. यावेळी त्यांनी ग्राहक हक्कांचे मुद्दे ठळकपणे मांडले आणि त्याच्या महत्त्वावर भर दिला. ग्राहकांच्या हक्कांवर बोलणारे ते पहिले जागतिक नेते ठरले. त्यानंतर दरवर्षी १५ मार्चपासून ग्राहक हक्क दिन साजरा होऊ लागला. ज्यात ग्राहकांच्या महत्वाच्या समस्यांवर योग्य दिशा देऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात.