Consumer Rights Day in Marathi : दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा केला जाणारा ‘जागतिक ग्राहक हक्क दिवस’ हा ग्राहकांना त्यांच्या सर्व हक्कांबद्दल, तसेच वस्तूचे प्रमाण, गुणवत्ता, शुद्धता इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जागरूक करणारा असतो. तसेच या दिवशी ग्राहकांना बाजारपेठेतील त्यांचे हक्क, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि व्यावसायिकांना योग्य व नैतिकतेने व्यवसाय करण्याची जाणीव करून दिली जाते.

जागतिक ग्राहक हक्क दिवस थीम २०२४ : [World Consumer Rights Day 2024 Theme]

सध्या आर्टिफिशयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची झपाट्याने होणारी प्रगती पाहता, कन्झ्युमर्स इंटरनॅशनलने [Consumers International] यंदाच्या वर्षी २०२४ ची जागतिक ग्राहक हक्क दिवसाची थीम ही ‘ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार AI’ [Fair and responsible AI for consumers] अशी ठेवलेली आहे. ही थीम कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रचंड वेगाने वाढणारे महत्त्व आणि त्यावर वेगाने हालचाल करण्याची गरज या बाबींवर भर देते.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
star pravah mi honar superstar chhote ustaad season 3 show winner
मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

हेही वाचा : Interim budget : १ फेब्रुवारीला सादर होणारे अंतरिम बजेट हे मूळ बजेटपेक्षा कसे वेगळे असते? निवडणुकांशी संबंध काय?

त्यामुळे यंदाचा जागतिक ग्राहक हक्क दिवस हा गोपनियता [प्रायव्हसी] उल्लंघन, ग्राहकांना चुकीची माहिती देणे, भेदभाव अशा गोष्टींवर प्रकाश टाकणारा आहे. यासह AI चा वापर करून चालवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवरून/ माध्यमांवरून खोटी माहिती कशी पसरू शकते आणि पूर्वग्रह यांबद्दल माहिती देणारे आहे.

ग्राहकांनी खरेदी केलेल्या उत्पादनांसह ते समाधानी नसतील किंवा त्यांची खोट्या वस्तू देऊन फसवणूक झाली असल्यास, ग्राहकांकडे तक्रार करण्याचे काही कायदेशीर अधिकार आणि नियम आहेत. हे अधिकार प्रत्येक व्यक्तीला एक ग्राहक म्हणून माहीत असणे आवश्यक आहेत. यामुळे त्रास झालेल्या ग्राहकांना भरपाई मिळण्यास तसेच चुकीच्या पद्धतीने केला जाणारा व्यापार यावर कारवाई करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे एक जागरूक नागरिक या नात्याने पुढील सहा मूलभूत हक्कांबद्दल माहिती पाहा

१. सुरक्षिततेचा अधिकार [Right to Safety]

हा हक्क बाजारात उपलब्ध असलेल्या घातक पदार्थांपासून ग्राहकांचे दीर्घकालीन संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी आहे. ग्राहकांना उत्तम दर्जाच्या वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने बाजारात विकल्या जाणाऱ्या जवळपास सर्व उत्पादनांसाठी मानके (standards) निश्चित केली आहेत उदा. ISI, AGMARK, FPO mark, इत्यादी. त्यामुळे उत्पादक आणि विक्रेते सुरक्षा मानके आणि नियमांचे पालन करण्यासाठी बांधील असतात.

हेही वाचा : जगातल्या सर्वात मोठ्या फुलाला येतो ‘सडक्या मांसाचा’ वास! काय आहे याचे नाव, जाणून घ्या

२. माहितीचा / माहिती मिळण्याचा अधिकार [Right to be Informed]

ग्राहक एखादी वस्तू विकत घेत असताना, त्या उत्पादनाबद्दल त्याला योग्य आणि अचूक माहिती देण्याचा हा हक्क आहे. यामध्ये ग्राहकांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, उत्पादन तारीख, एक्स्पायरी तारीख, उत्पादनाच्या वापरातून होणारे संभाव्य धोके इत्यादींसारखी कोणतीही माहिती ग्राहकाला देणे अनिवार्य असते.

३. निवड करण्याचा अधिकार [Right to Choose]

बाजारात योग्य दरात मिळणाऱ्या कोणत्याही उत्पादनांना खरेदी करण्याचा अधिकार हा ग्राहकाकडे असतो.

४. ऐकण्याचा / ऐकून घेण्याचा अधिकार [Right to be Heard]

ग्राहकांनी खरेदी केलेल्या उत्पादनासह किंवा सेवेसह ते नाखूष असल्यास, त्याबद्दल तक्रार मांडण्याचा हक्क ग्राहकाकडे आहे. याबद्दल ग्राहक संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करू शकतात.

५. नुकसान भरपाईचा अधिकार [Right to Seek Redressal]

ग्राहकांच्या कोणत्याही हक्कांचे उल्लंघन झाल्यास, ग्राहकांना त्या बदल्यात नुकसान भरपाई किंवा योग्य तोडगा काढण्याचा अधिकार आहे.

हेही वाचा : पुणे सायबर फ्रॉड! सोशल मीडियावर पोस्ट लाइक करताच बसला २० लाखांचा फटका; जाणून घ्या काय आहे प्रकरण….

६. ग्राहक शिक्षणाचा अधिकार [Right to Consumer Education]

ग्राहकांनी त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक राहणे हे प्रत्येक नागरिकाचे, तसेच ग्राहकाचे कर्तव्य आहे. म्हणूनच ग्राहक शिक्षणाच्या अधिकारात या संबंधित कौशल्ये आणि आवश्यक ते ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. या शिक्षणामुळे ग्राहकांना उत्पादनांची माहितीपूर्ण निवड करण्यास आणि चुकीच्या व्यापार पद्धतींपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत होते.