पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. समाजात लोकशाही टिकून ठेवण्यात प्रसारमाध्यमांचा मोलाचा हात असतो, यासाठी प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे. पत्रकारिता हे जोखमीचे काम आहे. अनेकदा सत्य जगासमोर मांडण्यासाठी पत्रकारिता करत असताना पत्रकारांवर हल्ले होतात, अनेकदा काही पत्रकारांना आपला जीव गमावावा लागतो. याची अनेक उदाहरणे जगभरात आहेत.

पण तरीही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी पत्रकार आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पण जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कोणतीही शक्ती दाबू नये म्हणून म्हणून त्यांना स्वातंत्र्य असणे अत्यंत गरजेचे आहे. तरचं ते चांगल्या प्रकारे आपले काम करु शकतील. याच उद्देशाने दरवर्षी ३ मे रोजी ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने पत्रकारितेतील स्वातंत्र्य, अधिकार आणि प्रसारमाध्यमांचे कायदे, नियम अधोरिखित केले जातात. तसेच आपली जबाबदारी पार पडताना प्राण गमावलेल्या पत्रकारांचे स्मरण केले जाते.

Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Vishwa hindu parishad
“आजारातून मुक्त होण्याचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न”, ख्रिसमस कार्यक्रम हिंदू संघटनांनी उधळला!
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
money laundering in immigration
ED On Canada Colleges : कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध; ‘ईडी’कडून धक्कादायक माहिती उघड
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल

कशी झाली ‘या’ दिवसाची सुरुवात

साल १९९१ मध्ये प्रथमच आफ्रिकन पत्रकारांनी वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी मोहीम सुरू केली. यावेळी ३ मे रोजी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या तत्त्वांबद्दल एक विधान जारी केले गेले, त्याला डिक्लेरेशन ऑफ विंडहोक या नावाने ओळखले जाते. यानंतर दोन वर्षांनी १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने प्रथमच ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून ३ मे हा ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ म्हणून पाळला केला जातो.

दरवर्षी ३ मे रोजी UNESCO मार्फत ‘Guillermo Cano World Press Freedom Prize’ दिले जाते. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पत्रकारितेशी संबंधित सर्व विषयांवर वाद-विवाद आणि चर्चसत्र होतात.

यंदाची थीम

दरवर्षी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची थीम निश्चित केली जाते. गेल्या वर्षी जागतिक पत्रकारिता दिनाची थीम ही ‘Journalism under digital siege’ यावर आधारित होती. या वर्षी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाचा ३० वा वर्धापन दिन आहे. २०२३ ची जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची थीम ‘Shaping a Future of Rights: Freedom of Expression as a Driver for all other human rights’ही आहे.

पत्रकारितेचे महत्व

पत्रकारिता ही एक मुक्त आणि स्वतंत्र्य संस्था आहे. जी लोकांना जगभरातील माहितीशी जोडण्यास मदत करते. यामुळे लोकांना निष्पक्ष निर्णय घेण्यास, नेत्यांना जबाबदार धरण्यास आणि त्यांचे ज्ञान वाढवण्यास मदत होते. पण माहितीचा प्रवाह राखण्यासाठी जनतेने प्रसार माध्यमांना पाठिंबा देणे आणि त्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे.

Story img Loader