जागतिक सर्प दिवस जगभरातील सर्पांच्या विविध प्रजातींविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. बरेच लोक सापांना घाबरतात. तरीही साप हा एक महत्त्वाचा प्राणी आहे. आपण राहतो त्या इकोसिस्टमसाठी साप महत्त्वाचे आहेत. सापांकडे त्यांचे संरक्षण स्वतःच करण्याचे तंत्र आहे. त्यांचे दात ते त्यांच्या विषारी विषासाठी वापरतात. लोकांना या सरीसृपांबद्दल आणि ते जगाला कशाप्रकारे योगदान देतात याविषयी अधिक जाणून घेण्यास मदत करण्यासाठी जागतिक सर्प दिन तयार केला गेला. जागतिक साप दिवस साजरा करण्यासाठी आणि त्यांचा रूपाविषयी आणि ते कसे जगतात याबद्दल जागरूकता करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक सर्प दिवसाचा इतिहास
साप हा आतापर्यंत अस्तित्वात असणा सर्वात प्राचीन जीवांपैकी एक आहे. साप जगातील विविध संस्कृतींमध्ये अस्तित्वात आहे. उत्तर कॅनडाच्या अर्ध-गोठलेल्या टुंड्रापासून ते अॅमेझॉनच्या हिरव्या जंगलांपर्यंत सापाच्या सुमारे ४५,४५८८ प्रजाती आहेत. साप जगातील बहुतेक समुद्रांमध्ये देखील आढळतात. ते निसर्गाचा समतोल राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सापांमध्येही विविधता असते. त्यांच्या काही जाती दिसण्यायला फार मोहक असतात.
जागतिक सर्प दिनाचे महत्त्व
जंगलतोड, हवामानातील बदलयामुळे सापाच्या अधिवासात घट होण्यासारखी परिस्थिती झाली आहे. त्यांचे हित जपण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. अंटार्क्टिका वगळता सर्व खंडात साप, समुद्र, जंगले, वाळवंट इथे आढळतात. कीटक, लहान उंदीर आणि बेडूक यासह साप वेगवेगळ्या प्राण्यांचा वापर अन्न म्हणून करतात. साप त्यांचा शिकार संपूर्ण खातात. काही फार मोठे साप अगदी लहान हरिण, डुकर, माकड खाऊ शकतात.