World Tsunami Awareness Day 2023 : दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस साजरा केला जातो. २२ डिसेंबर २०१५ रोजी संयुक्त राष्ट्रांनी ५ नोव्हेंबर हा जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. त्सुनामी हा सर्वांत विनाशकारी व धोकादायक नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे; ज्याला समुद्रकिनाऱ्यावर उदभवणाऱ्या नुकसानकारक लाटा म्हणूनही ओळखले जाते. त्सुनामीची निर्मिती कशी होते? त्याची नेमकी कारणे कोणती? आणि जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस का साजरा केला जातो? याबाबतची माहिती जाणून घेऊ.

मागील शतकात जवळपास ५८ त्सुनामींमुळे जवळपास दोन लाख ६० हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या तुलनेत जास्त आहे. त्यातील सर्वांत आपत्तीजनक व भयानक घटना डिसेंबर २००४ मध्ये घडली, जेव्हा हिंद महासागरात त्सुनामी आली; ज्यामध्ये इंडोनेशिया, श्रीलंका, भारत व थायलंडसह १४ देशांमधील दोन लाख २७ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. अशा या भयानक असलेली ही आपत्ती प्राणघातक ठरू नये म्हणून त्याबाबतची जागरूकता लोकांमध्ये निर्माण करावी यासाठी दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस साजरा केला जातो.

Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
Redevelopment, Kamathipura, BMC, MHADA
कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’ऐवजी पालिकेकडे ? विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय
Process of house sale by developer without lot Mumbai news
सोडतीविनाच विकासकाकडून घरविक्रीची प्रक्रिया?
Loksatta explained What is the exact reason behind the death of ten elephants in Bandhavgarh National Park in Madhya Pradesh
विश्लेषण: एकाच वेळी दहा हत्तींच्या मृत्यूमागे नेमके कारण काय?

हेही वाचा- तुम्हाला कधी कधी पहाटे अन् संध्याकाळच्या प्रकाशातही चंद्र का दिसतो? जाणून घ्या यामागील खरं कारण

२०२३ जागतिक त्सुनामी दिवसाची थीम

त्सुनामी आपल्या सर्वांसाठी एक धोका आहेच; परंतु विशेषतः महिला, मुले, अपंग आणि वृद्धांसाठी तो खूप मोठा धोका ठरतो. या वर्षीच्या जागतिक त्सुनामी जागरूकता दिनाचा मुख्य उद्देश या महाकाय लाटांमुळे निर्माण होणारे धोके कमी करण्याबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे. यंदाच्या जागतिक त्सुनामी जागरूकता दिनाची थीम ‘लवचिक भविष्यासाठी असमानतेशी लढा’ अशी आहे.

जागतिक त्सुनामी दिनाचे महत्त्व

जागतिक त्सुनामी जागरूकता दिन साजरा करण्यामागे त्सुनामीच्या धोक्यांबद्दल आणि अशा धोक्यांचा सामना करताना अवलंबल्या जाणाऱ्या सावधगिरीच्या उपायांबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्ती राष्ट्रीय सीमा ओलांडून जाऊ शकतात हे ओळखून, संयुक्त राष्ट्रांनी ५ नोव्हेंबर हा जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस म्हणून स्थापन करण्याची शिफारस केली. त्सुनामीचे विनाशकारी परिणाम होऊ शकतात; ज्यामुळे अनेकदा जीवितहानी होते. त्यासाठी त्सुनामीच्या आपत्तीबाबत जागरूकता आणि शिक्षण वाढवण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. त्सुनामीच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी लोकांमध्ये आवश्यक ज्ञान विकसित करणे हेच हा दिवस साजरा करण्याचे महत्त्व आणि उद्देश आहे.

त्सुनामी म्हणजे काय?

त्सुनामी हा जपानी शब्द ‘त्सू’ म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लहर यावरून आला आहे. भूकंप, भूस्खलन किंवा ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या समुद्रातील एखाद्या घटनेमुळे निर्माण होणारी त्सुनामी ही महाकाय लाट आहे. त्सुनामी ही एकच लाट नसून, समुद्राच्या तळाजवळ किंवा खाली भूवैज्ञानिक बदलांमुळे निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका आहे. या लाटा प्रचंड आकार धारण करू शकतात आणि त्या महासागर ओलांडून जमिनीवर पोहोचतात.

हेही वाचा- Earthquake in Delhi : दिल्लीत भूकंपाचे धक्के वारंवार का जाणवतात? जाणून घ्या कारण….

त्सुनामीची निर्मिती कशी होते?

१) समुद्राखालील भूकंप (Undersea Earthquakes) : भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा महासागरावर पडणाऱ्या मोठ्या उल्कापिंडाच्या प्रभावामुळे त्सुनामी उदभवू शकते. परंतु, बहुतेक विनाशकारी त्सुनामी समुद्राखालील भूकंपांमुळे निर्माण होतात; ज्यांचा केंद्रबिंदू फॉल्ट लाइनजवळ किंवा ५० किमीपेक्षा कमी खोलीवर होतो. जेव्हा दोन अभिसरण करणाऱ्या भूपट्टी (Lithospheric Plates) एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा हलक्या प्लेटच्या खाली जड प्लेट दबली जाते आणि शिलावरणाचे विस्थापन सबडक्शन झोनमध्ये होते. या प्रक्रियेदरम्यान भूकंप होतो; ज्यामुळे ‘त्सुनामी’ येते.

२) भूस्खलन (Landslides) : भूस्खलन, तसेच खडकांचे कोसळणे, बर्फाचे कोसळणे (Avalanches) इत्यादींमुळे समुद्रातील पाण्याचे विस्थापन झाल्यामुळे त्सुनामी लाटा निर्माण होतात. १९८० च्या दशकात दक्षिण फ्रान्सच्या किनारपट्टीवर विमानतळाच्या धावपट्टीच्या बांधकामामुळे पाण्याखाली भूस्खलन झाले. त्यामुळे थेब्स बंदरात विनाशकारी त्सुनामीच्या लाटा उसळल्या. समुद्राच्या तळाला भूकंप होऊन पाण्याखाली भूस्खलन होते. त्यामुळेदेखील त्सुनामी तयार होते.

३) ज्वालामुखीचा उद्रेक (Volcanic Eruptions) : जेव्हा जेव्हा समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा तेव्हा समुद्राच्या पाण्याचे अचानक विस्थापन होते आणि त्सुनामीच्या लाटा तयार होतात. इंडोनेशियातील क्राकाटोआच्या ज्वालामुखीचा स्फोट २६ ऑगस्ट १८८३ रोजी नोंदवलेल्या सर्वांत मोठ्या आणि सर्वांत विनाशकारी त्सुनामींपैकी एक होता. या स्फोटामुळे सुमारे ४० मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या; ज्याने जावा व सुमात्रा या दोन्ही बेटांमधील सुंदा सामुद्रधुनीलगतच्या किनारपट्टीच्या भागात विनाशात्मक परिस्थिती निर्माण केली आणि त्यामुळे ३६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

४) उल्का आणि लघुग्रह (Meteorites and Asteroids) : समुद्रात उल्का आणि लघुग्रह पडून त्सुनामी निर्माण होण्याचा संभाव्य धोका असतो.