World’s First Electric Car: पेट्रोल, डिझेल यांच्यावर चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होते. या वाहनांना पर्याय म्हणून लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. वीजेवर चालणाऱ्या या वाहनांमुळे प्रदूषण टाळले जाते. याशिवाय इंधनांच्या दरांमध्ये वाढ होत असल्याने बहुतांश लोक इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करत असल्याचे पाहायला मिळते. EV वाहनांना मिळणारा प्रतिसाद पाहून अनेक ऑटोमोबाइल कंपन्यांनीही इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करायला सुरुवात केली आहे.
बऱ्याच जणांना इलेक्ट्रिक कार ही नवीन आत्ताच्या काळातील संकल्पना आहे असे वाटते. पण वीजेवर चालणाऱ्या गाडीचा विचार फार आधी लोकांच्या डोक्यात आला होता. तब्बल २०० वर्षांपूर्वी पहिल्या इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्यात आली होती.
वीजेवर चालणारी जगातील पहिली Electric Car
१९ व्या शतकाच्या सुरुवातीपासून जगभरात ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित नवनवीन उपकरणे तयार केली जात होती. त्यावेळी चार चाकी वाहनांविषयी लोकांच्या मनावर प्रचंड कुतूहल होते. या काळात रस्त्यावर फक्त डिझेलवर चालणाऱ्या गाडी उपलब्ध होत्या. १८३२ मध्ये स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या रॉबर्ट अँडरसन यांनी पहिली-वहिली इलेक्ट्रिक चारचाकी गाडी बनवली. डिझेलवर चालणाऱ्या त्यांच्या गाडीचे रुपांतर वीजेवर चालणाऱ्या कारमध्ये केले. या कारमध्ये त्यांनी सिंगल चार्ज बॅटरीचा वापर केला होता.
EV क्षेत्राचा इतिहास
रॉबर्ट अँडरसन यांनी तयार केलेली EV कार ही सिंगल चार्ज बॅटरीवर ताशी 4 किलोमीटर वेगाने सुमारे 2.5 किलोमीटर धावत असे. हा आविष्कार झाल्यानंतर पुढे २० वर्षांनी रिचार्ज करण्याची सोय असलेली बॅटरी विकसित करण्यात आली. ही बॅटरी इलेक्ट्रिक कारमध्ये लावण्यात आली. १८६५ मध्ये लीड अॅसिड बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक कार रस्त्यावर धावली. या ऑटो क्षेत्राचा विकास होत गेला. १८९१ मध्ये अमेरिकेमध्ये पहिल्यांदा एका इलेक्ट्रिक कारची निर्मिती केली गेली. त्यानंतर ८ वर्षांनी थॉमस एडिसन यांनी जास्त कालावधीसाठी टिकणारी निकेल-अल्कलाइन बॅटरी बनवली.