Worlds Largest Office Building In India : जगातील सर्वात मोठ्या ऑफिस इमारतींबाबत बोलायचं झालं, तर तुमच्या मनात लगेच अमेरिका किंवा यूरोप देशातील इमारत येईल. यापूर्वी काही कालावधीपर्यंत असच होतं. अमेरिकेची पेटागन बिल्डिंग जगातील सर्वात मोठी ऑफिस इमारत असल्याचं म्हटलं जायचं. परंतु, आता तसं नाहीय. आता हे ठिकाण भारतात आहे. भारतातील एका इमारतीला जगातील सर्वात मोठ्या ऑफिस बिल्डिंगचा दर्जा मिळाला आहे. आता तुम्हाला प्रश्न नक्कीच पडले असतील की, ही इमारत भारताच्या कोणत्या ठिकाणी बांधण्यात आली आहे आणि या इमारतीचं नाव काय आहे? ही इमारत किती मोठी आहे? जाणून घेऊयात या प्रश्नांची उत्तरे सविस्तर.
सर्वात मोठ्या इमारतीचं नाव
भारताच्या गुजरातमधील सूरत या शहरात जगातील सर्वात मोठी ऑफिस इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीला डायमंड बोर्स नाव देण्यात आलं आहे. या इमारतीत हीरे व्यवसायासंबंधित कटर्स, पॉलिशर्स आणि व्यापारी वर्ग सर्व लोकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा – पूर आल्यावरही ‘ताजमहल’मध्ये शिरणार नाही पाणी! अशी काय सिस्टम आहे? जाणून घ्या
इमारतीचं श्रेत्रफळ
भारतातील ही इमारत २६०० कर्मचाऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे. या इमारतीचं क्षेत्रफळ ६७ लाख स्केअर फूट आहे. या इमारतीत १५ मजले आहेत आणि आयताकृती संरचना करून ही बांधण्यात आली आहे. या सर्व गोष्टींमुळे या इमारतीचं नाव जागतिक विक्रमाच्या लिस्टमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
अमेरिकेची पेटागन बिल्डिंग
डायमंडल बोर्सच्या आधी अमेरिकेची पेटागन बिल्डिंग जगातील सर्वात मोठी इमारत मानली जायची. सन १९४३ मध्ये अमेरिकेचं शहर एर्लिंगटन मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. ही इमारत ७ मजल्यांची आहे आणि यामध्ये २६००० लोक काम करु शकत होते. ही इमारत २३.५ मीटर उंच होती आणि याची फ्लोअर एरिया ६२३०००० वर्ग मीटर आहे.