जगात अशा अनेक वस्तू आहेत, ज्या एखाद्या हिऱ्याप्रमाणे अत्यंत मौल्यवान असतात. पण मानवी दातांसारख्या सामान्य गोष्टीलाही किती मोलाची किंमत मिळू शकते याबाबत तुम्ही कधी विचार केलाय का? आतापर्यंत विकल्या गेलेल्या सर्वांत जास्त किंमतीच्या मानवी दातांपैकी एक दात या बाबतीत अपवादात्मक उदाहरण असू शकते. या दाताची किंमत इतकी जास्त आहे की, ज्याची कोणीही कल्पना केली नसेल.
सर्वांत जास्त किंमतीला विकला गेलेला मानवी दात कोणाचा?
हा उल्लेखनीय दात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटनचा असून, तो जवळपास २०८ वर्षांपूर्वी विकला गेला होता.
हेही वाचा –कांदा तुम्हाला का रडवतो? जाणून घ्या कारण…
जगातील सर्वांत महागड्या मानवी दाताची किंमत किती?
१८१६ मध्ये आयझॅक न्यूटनचा एक दात लंडनमध्ये ३,६३३ यूएस डॉलरमध्ये विकला गेला होता, ज्याची किंमत आज तब्बल ३५,७०० यूएस डॉलर (रु. ३०.३२ लाख) इतकी आहे.
खरेदीदार एक उच्चभ्रू वर्गातील व्यक्ती होती, ज्यांनी हा दात अंगठीमध्ये बसवून घेतला होता. ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने अधिकृतपणे आतापर्यंत विकला गेलेला सर्वांत महागडा दात म्हणून त्याची नोंद केली आहे.
कोण होते सर आयझॅक न्यूटन?
सर आयझॅक न्यूटन इतिहासातील सर्वांत प्रभावशाली शास्त्रज्ञांपैकी एक होते, ज्यांचे १७२६ मध्ये निधन झाले. त्यांनी नैसर्गिक जगाबद्दलच्या आपल्या आकलनातून क्रांती घडवून आणणारा वारसा मागे सोडला आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियमाचे संशोधक म्हणूनही ते ओळखले जातात.
न्यूटन यांनी सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लावला आणि त्याचे श्रेय १६६६ मध्ये वूलस्टोर्प मनोर येथे त्याच्या बागेतील झाडावरून पडलेल्या सफरचंदाला दिले जाते. त्यांच्या लक्षात आले, “सफरचंद पडण्यास कारणीभूत असलेली शक्ती पृथ्वीभोवतीची चंद्राची प्रदक्षिणा आणि इतर ग्रहांच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणा यांसाठी जबाबदार आहे .”
त्याशिवाय कॅल्क्युलसचा शोध लावण्यासाठी प्रथम व्यावहारिक परावर्तित दुर्बिणी (First practical reflecting telescope) तयार करण्यासाठी आणि प्रकाशाचा सिद्धान्त विकसित करण्यासाठीही न्यूटन यांना ओळखले जाते