World’s Most Expensive Nail Paint: प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिच्याकडे उत्तम दर्जाची सौंदर्य उत्पादने असावी. जेव्हा मेकअपचा विचार केला जातो तेव्हा सर्वात आधी नावे लिपस्टिक आणि आय मेकअप उत्पादनांची येतात. मुलीही यावर खूप खर्च करतात. यासोबतच आजकाल क्रिएटिव्ह नेल आणि नेल आर्टलाही खूप महत्त्व दिले जात आहे. आज आम्ही तुम्हाला अशा नेलपॉलिशबद्दल सांगणार आहोत की त्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. ही नेलपॉलिश इतकी महाग आहे की ती विकत घेण्याऐवजी तुम्ही फ्लॅट, आलिशान कार, सोन्याचे किंवा हिऱ्याचे दागिने इत्यादी खरेदी करू शकता.
किंमत कोटींमध्ये आहे..
जर तुम्हाला सर्वात महाग नेलपॉलिशच्या किंमतीबद्दल विचार करण्यास सांगितले तर तुम्ही जास्तीत जास्त ५ हजार, ५० हजार किंवा जास्तीत जास्त १ लाख इतका विचार करू शकता. पण, जगातील सर्वात महागड्या नेल पेंटची खरी किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. जगातील सर्वात महागड्या नेलपॉलिशचे नाव Azature आहे. हे काळ्या रंगाचे नेलपॉलिश लॉस एंजेलिस येथील डिझायनर Azature Pogosian यांनी तयार केले आहे. आता त्याच्या किंमतीबद्दल बोलूया, तर ती सुमारे २५०००० डॉलर्स आहे, म्हणजेच भारतीय बाजारपेठेत या नेल पॉलिशची किंमत १ कोटी ९० लाख रुपये आहे.
Azature Pogosian लक्झरी ज्वेलरी डिझाइन करण्यासोबतच ब्लॅक डायमंड किंग म्हणूनही ओळखले जातात. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, आतापर्यंत जगात फक्त २५ लोकांना नेलपॉलिश खरेदी करता आली आहे.
( हे ही वाचा: ५ रुपयांचे जुने नाणे का बंद करण्यात आले? यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)
नेल पॉलिशमध्ये २६७ कॅरेटचे ब्लॅक डायमंड..
Azature ब्रँडची ही नेलपॉलिश डिझाइन करणाऱ्या डिझायनरने त्यात २६७ कॅरेट काळ्या हिऱ्यांचा समावेश केला आहे. यामुळेच या नेलपॉलिशची किंमत इतकी जास्त आहे. मात्र, Azature Pogosia डिझाइन केलेल्या या नेलपॉलिशशिवाय बाजारात अनेक महागडे नेलपॉलिश उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे त्याही चर्चेत आहेत.